ठाण्यामध्ये दोन्ही गटाचे शिवसैनिक आमनेसामने आल्याने मोठा राडा(political) पाहायला मिळाला. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षांच्या नेत्यांचा आज ठाणे दौरा आहे.

आनंद दिघेंच्या पुतळ्याला ठाकरे गटाच्या नेत्यांनी अभिवादन केले. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. आनंद दिघे यांच्या अनाथ आश्रमाबाहेर शिंदे यांच्या शिवसेना कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आनंद दिघेंच्या(political) प्रतिमेला अभिवादन केले. यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला.
संजय राऊत रोज सकाळी एकनाथ शिंदेंवर टीका करतात. ते कधीच आनंद दिघेंना भेटायला आले नाहीत. आम्ही काम करणारे शिवसैनिक आहोत, अशी टीका ठाकरेंच्या पक्षावर केली जात आहे. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
हेही वाचा :
‘एफआरपी’चा निर्णय! सरकारने सांगितलं पण शिंदेंना खटकलं, नेमकं काय घडलं?
Captain Rohit Sharma चा सिनेमा तुम्ही पाहिलात का ? क्रिकेटरने केलंय दिग्गज कलाकारांसोबत काम
सलमान खानचा सिकंदर प्रदर्शनासाठी सज्ज, पहिल्याच दिवशी तगडी कमाई करण्याची शक्यता