चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील उचली शिवारात एक (hanging)धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका प्रेमीयुगुलाने वीज टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहित रमेश लिंगायत वय २५, रा. उचली आणि एका १४ वर्षीय मुलीने रविवारी आपले जीवन संपवले.उचली येथील रोहित लिंगायत याचे चांदली येथील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. सदर मुलगी भंडारा जिल्ह्यातील एका वसतिगृहात राहत होती आणि नववीत शिकत होती. तिचे आई-वडील मजुरी करतात. काही दिवसांपूर्वी ती वसतिगृहातून घरी आली होती.

२६ फेब्रुवारीला सकाळी रोहित दुचाकीवरून तिच्या घरासमोर आला. त्याने तिला घराबाहेर बोलावून दुचाकीवर बसवले आणि तिला घेऊन पळून गेला. तिचे वडील मजुरीला गेले होते, (hanging)तर आई घरकामात व्यस्त होती. आई-वडिलांनी तिच्या मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तो बंद होता. त्यामुळे त्यांनी ब्रह्मपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली.
दरम्यान, उचली शिवारातील वीज टॉवरला गळफास लावलेल्या अवस्थेत एका अज्ञात युवक-युवतीने आत्महत्या केल्याचे काही नागरिकांना आढळून आले. या घटनेमुळे परिसरात(hanging) खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्रेमसंबंधातून आलेल्या नैराश्यातून या दोघांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आ
हेही वाचा :
‘एफआरपी’चा निर्णय! सरकारने सांगितलं पण शिंदेंना खटकलं, नेमकं काय घडलं?
Captain Rohit Sharma चा सिनेमा तुम्ही पाहिलात का ? क्रिकेटरने केलंय दिग्गज कलाकारांसोबत काम
सलमान खानचा सिकंदर प्रदर्शनासाठी सज्ज, पहिल्याच दिवशी तगडी कमाई करण्याची शक्यता