नांदेडमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली (educational)आहे. शाळेत सेवकाने चौथीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यासोबत लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली. शहरातील प्रसिद्ध ज्ञानमाता विद्या विहार शाळेत गुरुवारी 6 मार्च दुपारी प्रकार घडला आहे. पीडित विद्यार्थ्यांने या घटनेची माहिती आपल्या आई वडिलांना दिली. त्यानंतर त्याच्या पालकांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीचे नाव सबसिंग मच्छल वय ५० आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 0ज्ञानमाता विद्याविहार ही नांदेड शहरातील मालटेकडी बायपास रोडवर असलेली इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. याच शाळेत ५० वर्षीय सबसिंग मच्छल हा सेवक म्हणून काम करतो. गुरुवारी दुपारी शाळा सुटण्यापूर्वी चौथीत शिकत असलेला 10 वर्षाचा विद्यार्थी शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळल्यानंतर त्याने क्रिकेट किट स्टोअर रूममध्ये ठेवण्यासाठी गेला असता सेवकाने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. शाळा सुटल्यानंतर एका महिला शिक्षिकेला तो बालक घाबरलेल्या अवस्थेत रडत असल्याचे निदर्शनास आले. शाळा सुटल्यानंतर त्याने आपल्या vआईला घटनेची माहिती दिली.
त्यानंतर सांतापलेल्या आई-वडिलांनी तात्काळ विमाळतळ पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सेवकाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलीसांनी नराधम सेवक साबसिंग मच्छल याला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर यामध्ये आणखी कोणी सामील आहे का, आरोपीवर याआधी गुन्हे दाखल आहेत का? याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सुशीलकुमार नायक यांनी दिली आहे.
दरम्यान, शाळेतील स्टाफ आहे त्याचे कॅरेक्टर(educational) वेरिफिकेशन करावे आणि त्यांना जवाबदारीची जाणीव करून द्यावी, जेणेकरून अशा घटना होणार नाहीत, असे आवाहन पोलीस उपाधीक्षक सुशीलकुमार नायक यांनी शाळेच्या संचालकांना केले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकाकडून संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा :
वजन कमी करायचंय? मग सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा ओट्स ऑम्लेट
शक्तिपीठ महामार्गावरील मंदिरांसाठी ५-५ हजार कोटी निधी देऊन विकास साधावा – आमदार सतेज पाटील
महिमा चौधरीच्या 17 वर्षांच्या लेकीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष