युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्क च्या सार्वजनिक आरोग्य विभाग (tattoo)आणि क्लिनिकल रिसर्च विभागातील संशोधकांनी हेलसिंकी विद्यापीठासोबत टॅटू शाईच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचं आकलन केलं.’युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्क’ नुसार, टॅटू शाईमध्ये बरीच धोकादायक रसायनं असतात. जी त्वचेच्या आत खूप धोकादायक ठरता

ज्यामुळे लिम्फ नोड्सच्या कॅन्सरचा धोका असतो. आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी लिम्फ नोड्स खूप महत्वाचे आहेत. यामुळे, असामान्य पेशींची वाढ देखील नियंत्रित होते. ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.अॅनालिटिकल केमिस्ट्री जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, टॅटू शाईमध्ये (tattoo)अनेक धोकादायक रसायनं असतात ज्यामुळे त्वचा, फुफ्फुसं आणि यकृतामध्ये जळजळ होऊ शकते.
इतकंच नाही तर त्यामुळे मूत्रपिंड आणि मज्जासंस्थेचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, अनेक वेळ टॅटू काढण्यासाठी वापरलेली सुई योग्य नसते आणि त्यामुळे रक्ताद्वारे अनेक धोकादायक आजार पसरण्याचा धोका असतो.
यामुळे हिपॅटायटीस सी, एचआयव्ही किंवा एड्स, मेथिसिलिन-प्रतिरोधक (tattoo)स्टॅफिलोकोकस ऑरियस सारखे गंभीर आजार होण्याची धोका असतो.
मेडिकल न्यूज टुडेच्या वृत्तानुसार, स्वीडनमधील लिंड विद्यापीठातील संशोधकांना टॅटूमुळे कॅन्सरचा धोका आढळून आला आहे. या अभ्यासात असंही आढळून आलं की, टॅटू नसलेल्या लोकांपेक्षा टॅटू असलेल्या लोकांना लिम्फोमाचा धोका २१ टक्के जास्त असतो.
हेही वाचा :
वजन कमी करायचंय? मग सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा ओट्स ऑम्लेट
शक्तिपीठ महामार्गावरील मंदिरांसाठी ५-५ हजार कोटी निधी देऊन विकास साधावा – आमदार सतेज पाटील
महिमा चौधरीच्या 17 वर्षांच्या लेकीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष