आजकाल बहुतेक लोक रात्री मोबाईल फोन वापरतात. दिवसभराच्या (radiation)धावपळीनंतर जेव्हा लोकांना वेळ मिळतो तेव्हा ते रात्रीच्या वेळी सोशल मीडियावर वेळ घालवतात. काही लोक मोबाईल फोन वापरताना झोपी जातात, तर काही लोक तो उशाजवळ ठेवून झोपतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सकाळचा अलार्म मोबाईलमध्ये सेट केलेला असतो, जो वेळेवर उठण्यास मदत करतो. पण उशाजवळ मोबाईल ठेवून झोपल्याने खरोखरच मृत्यू होऊ शकतो का? किंवा यामुळे मेंदूला धोका आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात.

बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की, जर ते मोबाईल डोक्याजवळ किंवा उशीखाली ठेवून झोपले तर त्यातून धोकादायक रेडिएशन निघू शकतात, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. पण ही फक्त एक अफवा आहे. जागतिक आरोग्य संघटना WHO आणि आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था IARC सारख्या प्रमुख संस्थांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे सापडलेले नाहीत जे सिद्ध (radiation)करतात की मोबाईल फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे मेंदूला नुकसान होते.
दरम्यान, हे जरी खरं असलं तरी रात्री जास्त वेळ मोबाईल फोन वापरल्याने झोपेवर परिणाम होऊ शकतो. स्मार्टफोनमधून निघणारा निळा प्रकाश शरीरातील चांगल्या झोपेसाठी आवश्यक असलेल्या मेलाटोनिन हार्मोनचे उत्पादन कमी करतो. यामुळेच रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन वापरणाऱ्या लोकांना (radiation)झोप येण्यास त्रास होतो आणि त्यांच्या झोपेची गुणवत्ताही बिघडते.
झोपताना मोबाईल डोक्याजवळ ठेवू नका, तर टेबलावर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईलपासून दूर रहा, जेणेकरून तुम्हाला चांगली झोप मिळेल. तथापी, जर रात्री मोबाईल वापरणे आवश्यक असेल तर निळा प्रकाश फिल्टर चालू करा. जर तुम्हाला सकाळी अलार्मची आवश्यकता असेल तर मोबाईलऐवजी अलार्म घड्याळ वापरा.
हेही वाचा :
वजन कमी करायचंय? मग सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा ओट्स ऑम्लेट
शक्तिपीठ महामार्गावरील मंदिरांसाठी ५-५ हजार कोटी निधी देऊन विकास साधावा – आमदार सतेज पाटील
महिमा चौधरीच्या 17 वर्षांच्या लेकीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष