अभिनेता विकी कौशलचा छावा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई(box office) करत आहे. प्रदर्शित होऊन तीन आठवडे पूर्ण होत असतानाच, सिनेमाच्या कमाईत काहीशी घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे छावा 500 कोटींचा टप्पा गाठणार का? आणि तो गदर 2 चा रेकॉर्ड मोडू शकतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या 21 दिवसांपासून छावा बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. पहिल्या दोन आठवड्यांत सिनेमाने मोठी कमाई केली, मात्र तिसऱ्या आठवड्यात चित्र बदलले आहे. 21 व्या दिवशी सिनेमाने केवळ 5.35 कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून, आतापर्यंतच्या एकूण कमाईचा आकडा 496.24 कोटींवर पोहोचला (box office)आहे. आता पुढील काही दिवसांत 500 कोटींचा टप्पा पार होईल, अशी अपेक्षा आहे.
14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्या आठवड्यातच 225.28 कोटींचा गल्ला जमा केला. पहिल्या दिवशीच छावा ने 33.1 कोटींची ओपनिंग घेतली, त्यानंतर दररोज कमाईचा ग्राफ उंचावत गेला.दुसऱ्या आठवड्यातही सिनेमाने जबरदस्त कमाई करत 186 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.(box office) त्यामुळे पहिल्या दोन आठवड्यांची मिळून एकूण कमाई 411.46 कोटींवर पोहोचली होती.
तिसऱ्या आठवड्यात मात्र सिनेमाच्या कमाईत घट झाली. 21 दिवसांच्या आकडेवारीनुसार, छावा ची तिसऱ्या आठवड्यातील कमाई 79.43 कोटी इतकी झाली आहे.अभिनेता सनी देओलच्या गदर 2 सिनेमाने 21 दिवसांत 525.7 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे छावा 500 कोटींचा टप्पा पार करेल, मात्र गदर 2 चा रेकॉर्ड मोडू शकतो का, याबाबत साशंकता आहे.दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाचे बजेट 130 कोटी रुपये होते. आता सिनेमाने याच्या 4 पट अधिक कमाई केली आहे, जे निर्मात्यांसाठी नक्कीच मोठे यश मानले जात आहे.
हेही वाचा :
वजन कमी करायचंय? मग सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा ओट्स ऑम्लेट
शक्तिपीठ महामार्गावरील मंदिरांसाठी ५-५ हजार कोटी निधी देऊन विकास साधावा – आमदार सतेज पाटील
महिमा चौधरीच्या 17 वर्षांच्या लेकीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष