उन्हातही शरीराला थंडावा देणाऱ्या या गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश कराच

बदलत्या वातावरणासोबत आपल्या आहारातही बदल होत (diet)असतात. हिवाळा ऋतु संपून उन्हाळा ऋतुला सुरुवात झाली आहे. अशा वेळी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजे आहे. कडक उन्हामुळे डिहायड्रेशन आणि स्कीनच्या समस्येसह अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. जर वातावरणानुसार, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल केला नाही तर अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

दही आणि ताक
उन्हाळ्यात दही आणि ताकाचे सेवन केल्याने पचनक्रिया निरोगी राहते. आणि शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतं जे आतड्यांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. ताकसुद्धा शरीराला थंड ठेवण्यासह पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचे काम करते.

हलके जेवण खा
उन्हाळ्यात तळलेले आमि चमचमीत पदार्थ खाणं टाळा. (diet)या पदार्थांमुळे पचनाशी संबधित समस्या निर्माण होऊ शकते. याऐवजी हलके आणि लवकर पचन होईल असे अन्न खा. जसे की, खिचडी, मूग दाळ आणि सूपचा डाएटमध्ये समावेश करा. तसेच चपातीचाही डाएटमध्ये समावेश करु शकता.

पुदीना आणि लिंबू
पुदीना शरीराला आतून थंड ठेवण्याचं काम करतं. तुम्ही लिंबू पाणीमध्ये पुदीना मिक्स करुन पिऊ शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करतात.

डाळींचा समावेश करा
डाएटमध्ये मूगाची डाळ किंवा तूरीच्या डाळीचा समावेश करा. यामध्ये प्रोटीन, आयरन, आणि व्हिटॅमिन बी १२ मुबलक प्रमााणात आढळतात. तसेच डाळींमध्ये फायबर असल्यामुळे (diet)पोट अधिक काळ भरलेले राहते.

नारळ पाणी
उन्हाळ्याच तापमान जास्त असल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्बवू शकते. म्हणून दररोज नारळ पाणी प्या. यामद्ये इलेक्ट्रोलाइट्स, मिनर्ल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. जे शरीराला हायड्रेट ठेवण्यासह शरीराच्या तापमानाला संतुलित ठेवण्याचे काम करता

हेही वाचा :

वजन कमी करायचंय? मग सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा ओट्स ऑम्लेट

शक्तिपीठ महामार्गावरील मंदिरांसाठी ५-५ हजार कोटी निधी देऊन विकास साधावा – आमदार सतेज पाटील

महिमा चौधरीच्या 17 वर्षांच्या लेकीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष