पैशांचा पाऊस पाडणाऱ्यांचा ग्रामस्थांनी उधळला डाव, अघोऱ्यांचा ‘रात्रीस खेळ’, जिवंत व्यक्तीला कपड्यात बांधून…. 

पेण तालुक्यातील पूर्व विभागातील वाकरूळ ग्रामपंचायत(Villagers) हद्दीत असणाऱ्या नाडे गावाच्या स्मशानभूमीत बुधवार ५ मार्च रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास अनोळखी ५ ते ६ व्यक्तींनी अघोरी प्रथेचा डाव मांडला होता.

रात्री स्मशानभूमीत आगळेवेगळे खेळ चालत असल्याची खबर नाडे ग्रामस्थांना(Villagers) कळताच गावातील ग्रामस्थांनी स्मशान भूमीवर येऊन पाहिले तर कोणी एका अनोळखी जिवंत व्यक्तीला कपड्यात बांधून स्मशानभूमी सभोवताली फिरवला जात आहे. असे समजताच ग्रामस्थांनी त्यांना पुढे जाऊन विचारणा करताच या अनोळखी व्यक्तींची पळापळ झाली. ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने यातील २ व्यक्तींना पकडले आणि पेण पोलिसांना बोलावून पोलिसांच्या ताब्यात दिले.

पेण तालुक्यातील नाडा गावातील स्मशानभूमीच्या शेडमध्ये (प्रेत जाळण्याच्या) नारळ, लिंबू, मानवी कवटी, अगरबत्ती, डमरु, पेटलेले नारळ, गोमूत्र, भागवा कपडा, शंख, लाकडाच्या छोट्या जुड्या, भस्माची डबी आदी साहित्य घेऊन आरोपी बिपीन अंबिका शर्मा, राजेश किसन म्हात्रे, प्रशांत राजेंद्र शिर्के, तिन्ही राहणार कोपरखैरणे, नवी मुंबई हे पेण तालुक्याच्या पूर्व भागातील नाडा निंबारवाडी येथील नाडा गावच्या स्मशानभूमीत अघोरी जादुटोणा करण्यासाठी आले होते. मात्र, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही मंडळी पोलिसांच्या हाती लागली.

नाडा गावच्या ग्रामस्थांना(Villagers)रात्रीच्या सुमारास स्मशानभूमीत काहीतरी चालले आहे, असा संशय आल्याने ग्रामस्थ एकत्र येऊन स्मशानभूमीत गेले. तेव्हा प्रथमदर्शनी सर्व प्रकार बघितल्यानंतर त्यांना जादूटोण्याचा काही तरी प्रकार चालू असल्याचा संशय आला. त्यांनी खातरजमा करण्यासाठी यातील आरोपी बिपीन शर्मा व राजेश म्हात्रे यांना विचारणा केली. त्यावेळी ते पळून जाऊ लागले, ग्रामस्थांनी अडविण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या अंगावर गाडी घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ग्रामस्थांनी यातील आरोपीसह गाडी ताब्यात घेतली आणि पेण पोली ठाण्यास सर्व हकीकत कळवली.

वेळेचा विलंब न करता पेण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समर बेग हे आपली टीम घेऊन तात्काळ घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांनी आरोपी बिपीन अंबिका शर्मा, (वय-२९, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई), राजेश किसन म्हात्रे, (वय ४०, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) यांना व त्यांच्याकडील एक चारचाकी गाडी ताब्यात घेतली असल्याचे कळविल्याने पोउनि. बेग, सपोफी. पाटील, पोह व्हसकोटी, पोह म्हात्रे, वगैरे पोलीस स्टाफ हे तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले.

पेण पोलीस स्टेशन येथे गुन्हा. रजि. नं.३४/२०२५, भा.न्या.सं.२०२३ चे कलम १०९(१), ३(५) सह महा. नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध करणेकरिता व त्यांचे समुळ उच्चाटन करिता अधि. २०१३ चे कलम ३ (१) (२) अन्वये हा गुन्हा दिनांक ०६/०३/२०२५ रोजी ११.१६ वा. दाखल केला असुन तपासात प्रशांत राजेंद्र शिर्के, (चय-२७ वर्षे, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई ) आरोपी निष्पन्न करुन अटक केले आहे.

हेही वाचा :

आयपीएलपूर्वी स्टार क्रिकेटरने दिली गोड बातमी

अरे बापरे! आईस्क्रीममध्ये आढळला चक्क साप, लोकांच्या जीवाशी खेळ, PHOTOS व्हायरल

 गृहिणींना दिलासा, बाजारात लसूणच्या किंमतीत घट