सलमान आणि शाहरुख खानचा मृत्यू??? ‘त्या’ व्यक्तीच्या दाव्याने सिनेसृष्टीत एकच खळबळ

बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान फिल्म इंडस्ट्रीवर(film industry) अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या केवळ भारतातच नाही तर जगभरात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई होत असते. मात्र, आता एका प्रसिद्ध ज्योतिषाने या दोघांच्या भविष्यासंदर्भात धक्कादायक दावा केला आहे. या ज्योतिषाने त्यांच्याबाबत केलेली भविष्यवाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

प्रसिद्ध यूट्यूबर आणि मुलाखतकार सिद्धार्थ कन्नन(film industry) याच्या मुलाखती नेहमीच चर्चेत असतात. त्याने अलीकडेच ज्योतिषी सुशील कुमार यांची मुलाखत घेतली. सुशील कुमार हे ज्योतिषशास्त्र तसेच नाडी शास्त्राचे अभ्यासक असल्याचे सांगितले जाते. या मुलाखतीत त्यांनी सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या आयुष्याविषयी धक्कादायक विधान केले.

त्यांच्या मते, “सलमान खान यांच्यासाठी सध्या प्रतिकूल काळ सुरू आहे, तर शाहरुख खान यांचे आयुष्य स्थिर आहे. मात्र, भविष्यात सलमान खान एका गंभीर आजाराला सामोरे जातील. हा आजार त्यांना शेवटच्या काळात खूप त्रासदायक ठरणार आहे. मी यापूर्वीही याविषयी अनेक वेळा इशारा दिला आहे.”

सुशील कुमार यांनी याच मुलाखतीत आणखी धक्कादायक दावा केला. ते म्हणाले, “सलमान खान आणि शाहरुख खान यांचे वय केवळ ६७ वर्षे इतकेच आहे. दोघेही वयाच्या ६७व्या वर्षीच निधन पावतील आणि विशेष म्हणजे त्यांच्या मृत्यूचे वर्षही एकच असेल. ज्योतिषशास्त्राच्या विद्या वापरून मृत्यूची अचूक भविष्यवाणी करता येते.”

या विधानानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर यावर प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त केला आहे. काहींनी या भाकिताला गंभीरतेने घेतले तर काहींनी त्यावर टीका केली आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले, “कोणताही खरा ज्योतिषी कोणाच्या मृत्यूची भविष्यवाणी करत नाही.” या वादग्रस्त दाव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा :

 गृहिणींना दिलासा, बाजारात लसूणच्या किंमतीत घट

होळीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गूडन्यूज, महागाई भत्ता वाढणार

पैशांचा पाऊस पाडणाऱ्यांचा ग्रामस्थांनी उधळला डाव, अघोऱ्यांचा ‘रात्रीस खेळ’, जिवंत व्यक्तीला कपड्यात बांधून….