प्रत्येक महिन्याला महिलांना मिळणार 2500 रुपये, नेमकी काय आहे योजना?

आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या महिलांसाठी सरकार विविध योजना(scheme)राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक साक्षर करणे हा हेतू आहे. दरम्यान, दिल्लीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने त्यांना दरमहा 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, ते आता पूर्ण होणार आहे.

महिला समृद्धी योजनेला(scheme) मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता महिलांच्या खात्यात दरमहा 2500 रुपये येणार आहेत. या योजनेचा दिल्लीतील 15 ते 20 लाख महिलांना फायदा होणार आहे. पण हे पैसे कोणाला मिळणार? कोणती कागदपत्रे लागणार? याबाबतची माहिती घेऊयात.

महिला समृद्धी योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता महिलांच्या खात्यात दरमहा 2500 रुपये येणार आहेत. दिल्ली सरकारच्या महिला समृद्धी योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळणार नाही. ही योजना विशेषतः ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये किंवा त्याहून कमी आहे त्यांच्यासाठी आहे. ही योजना कर न भरणाऱ्यांसाठी आहे. अशा महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी दिल्ली सरकारने महिला समृद्धी योजना आणली आहे. या योजनेची अधिकृत घोषणा झाल्यानंतर महिलांच्या खात्यात दरमहा 2500 रुपये येणे सुरू होईल.

ज्या महिला सरकारी नोकरी करत नाहीत आणि त्यांचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान आहे. ज्या महिलांना शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महिलेकडे दिल्लीचा पत्ता पुरावा म्हणजे अर्जदाराकडे किमान पाच वर्षे दिल्लीत राहिल्याचा पुरावा असणे गरजेचं आहे. दिल्लीत एकच बँक खाते असावे, अनेक बँक खाती नसून ते खाते आधारशी जोडलेले असावे. दरम्यान, ज्या महिला पात्र असतील त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

तुम्हाला ‘या’ पाच कागदपत्रांची आवश्यकता
अर्ज करणाऱ्यांसाठी आधार कार्ड
शिधापत्रिका
पत्त्याचा पुरावा
उत्पन्न प्रमाणपत्र
दिल्लीतील बँक खाते आणि मोबाईल क्रमांक

कसा कराल अर्ज?
या योजनेत लाभार्थी होण्यासाठी तुम्हाला स्वतःची नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी वेगवेगळ्या केंद्रांवर होतील. याशिवाय योजनेत लाभार्थी जोडण्यासाठी अनेक मोठ्या बाजारपेठा आणि सोसायट्यांमध्ये नोंदणी काउंटरही सुरू करण्यात येणार आहेत. मात्र ही नोंदणी कधी सुरू होणार याबाबत अधिकृत माहिती नाही.

हेही वाचा :

काँग्रेसला धक्का! पश्चिम महाराष्ट्रातला बडा नेता राष्ट्रवादीच्या गळाला

14 मार्चचं चंद्रग्रहण ठरणार गेमचेंजर, ‘या’ 4 राशींना लागणार जॅकपॉट! प्रत्येक कामात यश, नोकरीत प्रमोशन, धनलाभ

भारत आणि न्यूझीलंडच्या अंतिम सामन्यात पाऊस अडथळा ठरणार?