मद्यधुंद अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर झोपला होता तरुण; अंगावरुन मालगाडी गेली अन्…,Video Viral

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ(Video) आपल्याला पाहायला मिळतात. कधी चित्र-विचित्र तर कधी धक्कादायक असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा हे व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एख तरुण मद्यधुंद अवस्थेत रेल्वेरुळावर झोपला होता. मात्र याच वेळी त्याच्यासोबत असे काही घडले की, चमत्कारच म्हणायचा. पेरुमधील पेमा शहरात ही घटना घडली आहे.

अलीकडे तरुणांमध्ये मद्यपानाचे सेवन वाढले असून यामुळे मोठे अपघात घडले आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) देखील एका मद्यपान केलेल्या तरुणाचा आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण मद्यधुंद अवस्थेत रेल्वेरुळावर पडला आहे. याचवेळी एका बाजून एक मालगाडी येते. आश्चर्यची बाब म्हणजे मालगाडी त्यांच्या अंगावरुन जाते. मात्र तरुणाला कोणतीही दुखापत होत नाही. तो रेल्वेचा आवाज ऐकताच उठण्याचा प्रयत्न करत असतो.

पण त्याआधीच त्याच्या अंगावरुन रेल्वे जाते. मात्र तरीही त्याचे प्राण वाचतात. हा प्रसंग अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारिकच म्हणावा असा आहे. मात्र, कोणावर कधी वाईट वेळ येईल सांगता येत नाही. अनेकदा अशा प्रसंगी जीव जाण्याचीही शक्यता असते किंवा भाग्यवान असाल तर यातून जीव वाचण्याचीही शक्यता असते. स्थानिक पोलिंसानी दिलेल्या माहितीनुसार, तरुण मद्यधुंद अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर झोपला होता. त्याला किरकोळ जखमा झाल्या असून त्याच्यावर उपचार करण्यात आला आहे.

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. @Anewz_tv या एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, त्याचे नशीब बलवत्तर आहे, तर दुसऱ्या एका युजरने दारुन त्याला वाचवले असे म्हटले आहे. एका युजरने काय चमत्कार घडला असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

हद्द वाढ विरोधकांच्याकडून त्यांच्याच नेत्यांचा पंचनामा

होळी सणानिमित्त प्रवाशांसाठी खुशखबर!

इथून पुढे विचारू नका Who Is Dhangekar?; हाती ‘धनुष्य’ घेण्यापूर्वीच पवारांच्या नेत्यानं पेटवली वात