मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता ३ ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महाराष्ट्राचे अर्थमंत्री(budget) अजित पवार यांनी आज विधीमंडळात केली. ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ देखील आयोजित केला जाणार आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प(budget) सादर करताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले. केंद्र सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठीला अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली, आणि याच तारखेला दरवर्षी ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार, ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येईल. तसेच, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे ‘अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र’ आणि अनुवाद अकादमी स्थापन करण्यात येणार आहे.
मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य सरकार विविध उपक्रम राबविणार असून, संशोधन व अनुवाद कार्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देणार आहे. यासोबतच, मराठी भाषेतील संशोधन व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विशेष पुरस्कार देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी(budget) जाहीर केले.
अर्थसंकल्पीय भाषणात मराठी भाषेचा गौरव करताना अजित पवार म्हणाले,
“भाव फुलांना पायी उधळून, आयुष्याचा कापूर जाळून, तुझे सारखे करीन पूजन, गीत तुझे मी आई गाईन शब्दोशब्दी अमृत ओतून…”
या घोषणेमुळे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अधिक प्रयत्न केले जातील आणि जागतिक स्तरावर मराठीचा सन्मान वाढेल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा :
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आले आमनेसामने
कर्तबगार महिलांचा राज्यस्तरीय गौरव सोहळा संपन्न
अर्थसंकल्पात दमदार गिफ्ट! AI तंत्रज्ञान ते मोफत वीज, शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा