“राज” तेरी गंगा मैली…..!

प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, आणि ग्रेट शो मन म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीत ओळखले जाणारे राज कपूर यांचे सध्या शताब्दी वर्ष सुरू आहे. रसिकांचे भरभरून मनोरंजन करणारे आणि समाजाला एक प्रकारचा संदेश देणारे अनेक हिंदी चित्रपट त्यांनी निर्माण केले. त्यापैकीच एक”राम, तेरी गंगा मैली”हा चित्रपट होय. तब्बल 40 वर्षानंतर हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे(political updates) यांनी गंगा नदीच्या पाण्याच्या शुद्धतेबद्दल प्रश्नचिन्ह उभा केल्यानंतर,”राज, तेरी गंगा मैली”अशी उपहासात्मक चर्चा सुरू झाली आहे.

पिंपरी चिंचवड महानगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 19 वा वर्धापन दिन रविवारी संपन्न झाला. यावेळी केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी महा कुंभ मेळा झाल्यानंतर गंगा नदी कमालीची प्रदूषित झाली असल्यामुळे, मला कोणी गंगाजल दिले तरी ते मी पिणार नाही, असे वक्तव्य केले होते. महा कुंभमेळा, त्यानिमित्ताने प्रयागराज येथे दररोज उसळलेली गर्दी, करोडो लोकांनी गंगा नदीत केलेले अभ्यंगस्नान, त्यामुळे गंगा नदी ही प्रदूषित बनली आहे. हे स्पष्ट करताना त्यांनी अशा प्रकारचे अभ्यंग स्नान म्हणजे अंधश्रद्धा असल्याचे सुचित केले आहे. लोकांनी आता अंधश्रद्धा सोडली पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

गंगा नदी बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना डिवचले आहे. अशा प्रकारचे वक्तव्य आमच्या सेनेकडून झाले असते तर हे दोन्ही नेते आमच्यावर तुटून पडले असते. आता राज ठाकरे यांच्या वक्तव्याबद्दल त्यांची भूमिका काय असणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

तब्बल 144 वर्षानंतर प्रयागराज येथे गंगा नदीच्या संगमावर महा कुंभ मेळ्याचे उत्तर प्रदेश सरकारने महा आयोजन केले होते. महिन्याभरात जवळपास 65 कोटी लोकांनी गंगा नदीत अभ्यंग स्नान केले आहे. या 65 कोटी लोकांच्या श्रद्धेला राज ठाकरे हे अंधश्रद्धा म्हणत असतील तर त्यांच्या या मताचे समर्थन कसे करता येईल? कारण हिंदू धर्मात गंगा नदीला अतिशय पवित्र मानले जाते.

या महा कुंभ मेळ्याच्या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने (political updates)येणाऱ्या करोडो भाविकांसाठी ज्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या त्याची जागतिक पातळीवर चर्चा झाली. या महा कुंभमेळ्यात कोणताही पशुबळी नाही, रक्तपात नाही, ड्रेस कोड नाही, हिंसाचार नाही, राजकारण नाही, धर्मांतर नाही, भेदभाव नाही, 44 दिवसात तब्बल 65 कोटी भाविक येतात आणि गंगा नदीत अभ्यंग स्नान करतात ही अंधश्रद्धा नाही तर निव्वळ आणि निव्वळ श्रद्धा आहे.

हिंदू धर्मात गंगा नदीला अनन्य साधारण महत्व आहे. ती या देशाची प्रमुख नदी आहे. गंगा नदीत एकदा तरी स्नान करावे अशी प्रत्येक हिंदूंची इच्छा असते. महा कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आणि तो सुरू होण्यापूर्वीच त्याला मिळालेली अफाट प्रसिद्धी, परिणामी हिंदू धर्मियांनी प्रयागराज येथे जाण्याचे नियोजन केले होते. देशातीलच नव्हे तर परदेशातील लोकही इथे आले होते. 44 दिवसात 65 कोटी लोकांनी गंगा नदीत स्नान केल्यामुळे ही नदी थोड्याफार प्रमाणात प्रदूषित झालीही असेल. पण त्याला अंधश्रद्धा कसे म्हणता येईल?

महा कुंभ मेळा सुरू असताना पर्यावरण आणि जलतज्ञांनी गंगा नदी ही कधीही प्रदूषित होत नाही. गंगेचे पाणी शुद्ध करण्याची एक विशिष्ट नैसर्गिक यंत्रणा गंगेच्याच पोटात असल्याचे निष्कर्ष काढले होते. गंगेत स्नान केल्यामुळे मन शुद्ध होते, मनातील वाईट विचार निघून जातात, पाप धुतले जाते असे मानले जाते.”राम, तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते”असे शीर्षक गीत या चित्रपटात आहे. पाप मुक्त होण्याचे, अध्यात्मिक तत्त्वज्ञान गंगेतील पवित्र स्नानासाठी सांगितले गेले आहे. या एकूण पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी गंगास्नानाबद्दलची जी खिल्ली उडवलेली आहे ती समर्थनिय नाही.

हिंदू धर्मामध्ये सांगितलेला किंवा केला जात असलेला प्रत्येक धार्मिक विधी हा ग्रह, नक्षत्र आणि विश्वाच्या गतीशीलतेशी जोडला गेलेला आहे. त्याचा मानवी जीवनावर भौतिक आणि अध्यात्मिक प्रभाव पडत असतो. एक हिंदू म्हणून राज ठाकरे यांनी महा कुंभ मेळ्याबद्दल विचार करणे आवश्यक होते मात्र एक राजकारणी(political updates) म्हणून ते या महा कुंभमेळ्याकडे बघतात आणि त्यावर टीका करतात. “राम तेरी नही, तर राज तेरी गंगा मैली हो गई”असे उपहासाने कोणी म्हटले तर त्यात वावगे काय?

हेही वाचा :

लाईटच्या समस्येमुळे पुरस्कार सोहळ्यात व्यत्यय; आयुक्त मॅडमने दिले दुरुस्तीचे आश्वासन

“धंगेकरांच्या पत्नीला अटक होईल अशी भीती…; खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कायमचा होईल गायब! आहारात ‘या’ मसाल्याच्या पदार्थाचे सेवन