१३, १४ अन् १५ मार्चला बँकांना सुट्टी

देशभरात १३ आणि १४ मार्च रोजी होळी साजरी करण्यात (Banks)येणार आहे. १३ तारखेला होळी तर १४ तारखेला धुलिवंदन साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी बँका बंद असणार आहे. परंतु वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या तारखांना सुट्टी असणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या सुट्ट्यांची यादी जाहीर करते. यावर्षी १३ आणि १४ तारखेला होळी साजरी केली जाणार आहे.१३ मार्च रोजी होलिका दहन असणार आहे. त्यामुळे उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये बँका बंद राहणार आहेत. या दिवशी सर्व क्रोध, राग, वाईट गोष्टी या होळीत जाळून टाकतात.

१४ मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रात १४ मार्च रोजी धुलिवंदन साजरा केलं जाणार आहे. या दिवशी सर्वजण एकमेकांना रंग लावतात. या दिवशी गुजरात, ओडिशा,(Banks) चंदीगढ, सिक्कीम, आसाम, हैदराबाद, अरुणाचल प्रदेश, गोवा, बिहार, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश या ठिकाणी बँका बंद राहणार आहेत.

१५ मार्च २०२५ हा तिसरा शनिवार आहे. त्यामुळे बँका उघडणार आहेत. परंतु तरीही काही राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे. १५ मार्च रोजी त्रिपुरा, ओडिशा, मणिपुर या ठिकाणी सुट्टी असणार आहे. मणिपुरमध्ये १५ मार्चला याओसांग हा सण असल्याने सुट्टी असणार आहे.

उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये बँका बंद राहणार आहेत. १३ (Banks)आणि १४ मार्च हे दोन दिवस या राज्यांमध्ये पब्लिक हॉलिडे जाहीर करण्यात आले आहे. या काळात जरी ऑफलाइन ब्रँच बंद असल्या तरीही इंटरनेट बँकिंग, ऑनलाइन बँकिंग सेवा सुरु असणार आहे.

हेही वाचा :

एकनाथ शिंदेंना मोठा झटका! ‘त्या’ 3 महत्वाकांक्षी योजना बंद!

घरगुती वादातून पाईपने मारहाण करुन मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून

मंदिराच्या उंबरठ्याशी औरंगजेबाचा फोटो आणि गावकऱ्यांनी लिहिले औरंग्या, पुढे केले असे काही की…, Video Viral