सोने आणि चांदीने गेल्या दोन दिवसांत महागाईचे रंग उधळले.(records) महागाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. आता सोन्याची 90 हजारी झेप सुरू झाली आहे. तर चांदीने लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ऐन रंगोत्सवातच दोन्ही धातुनी ग्राहकांना महागाईचा रंग दाखवला. शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याने गुंतवणूकदार अगोदरच चिंतेत असताना त्याला मौल्यवान धातुत गुंतवणूक करण्यासाठी अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. दोन दिवसात दोन्ही धातुनी महागाईचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या

सोन्याची महागाईची धुळवड
या आठवड्यात सोन्याने दरवाढीचे सत्र आरंभले आहे. सोने गेल्या चार दिवसात चकाकले आहेत. सोमवारी सोने 110 रुपयांनी वधारले. तर मंगळवारी 330 रुपयांनी स्वस्त झाले. बुधवारी 490 रुपये तर गुरूवारी 600 रुपयांनी सोने महागले. दोनच दिवसात सोन्याने 1000 हून अधिकचा पल्ला गाठला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 81,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 88,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीने ओलांडला लाखांचा टप्पा
चांदीने या आठवड्यात मोठी मुसंडी मारली. सुरुवातीच्या (records)दोन दिवसात चांदी किलोमागे 1100 रुपयांनी स्वस्त झाली. तर बुधवारी 2 हजार आणि गुरूवारी 1 हजारांनी चांदी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,01,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोने 86,843, 23 कॅरेट 86,495 22 कॅरेट सोने 79,548 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 65,132 रुपये, 14 कॅरेट सोने 50,803 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 98,322 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता(records) येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
हेही वाचा :
ठाकरे गटाला धक्का ! ‘या’ फायरब्रँड महिला नेत्याचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
उन्हाळ्यात काकडीचा रायता खाताय? तर ‘ही’ बातमी वाचाच
परीक्षेसाठी पत्नी बाहेरगावी गेल्यावर पतीने मेव्हणीसोबत केलं लग्न; नंतर बायकोला व्हिडिओ कॉल केला अन्…