मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेला (third)अभिनेता आमिर खान लग्नाच्या बाबतीत मात्र नेहमीच चर्चेत असतो. पहिलं लग्न मोडून दुसरं लग्न केल्याने आमिर चांगलाच चर्चेत आला होता. आता आमिर तिसऱ्या लग्नामुळेही चर्चेत आला आहे. त्याच्या 60व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच त्याने त्याच्या लव्ह लाइफची घोषणा केली आहे. आमिरने त्याच्या गर्लफ्रेंडला थेट मीडियासमोरच आणलं आहे. लवकरच आमिर तिसरं लग्न करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आमिर खानचा उद्या 14 मार्च रोजी 60 वा वाढदिवस आहे. एक दिवस आधीच आमिरने पॅपराजींसोबत वाढदिवस दणक्यात साजरा केला. यावेळी त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहे. आमिरने केवळ वाढदिवसच साजरा केला नाही तर त्याची गर्लफ्रेंड गौरीचीही पॅपराजीशी भेट घालून दिली. मात्र गौरीचा फोटो कोणत्याच सोशल मीडियाला पोस्ट झालेला नहाी. आमिरने प्रायव्हसीचा भाग म्हणून गौरीचे फोटो शेअर न करण्यास पॅपराजींना सांगितलं. आमिरची नवी गर्लफ्रेंड बॉलिवूडशी संबंधित नाही. ती बंगळुरूची(third) राहणारी आहे. दोघेही दोन ते तीन वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे गौरीला एक 6 वर्षाचा मुलगाही आहे.
शाहरुख, सलमानशी गाठीभेटी
शाहरुख आणि सलमान खान 12 मार्च रोजी आमिर खानच्या घरी गेले होते. यावेळी तिघांनी मिळून वाढदिवस साजरा केला. एवढेच नव्हे तर आमिर खान सलमानला सोडायला त्याच्या कारपर्यंत आला होता. तर शाहरुख खान मीडियापासून चेहरा लपवत निघून गेला होता. दरम्यान, आज वाढदिवस साजरा करताना आमिर खानच्या गर्लफ्रेंडने शाहरुख खान आणि सलमान खानशी भेट झाल्याचं सांगितलं.
25 वर्षापूर्वीची भेटी
दरम्यान, आमिर खान आणि गौरीची पहिली भेट 25 वर्षापूर्वी झाली होती. तेव्हा दोघांमध्ये असं काहीच नव्हते. ती एक नॉर्मल भेट होती. गौरी आमिर खानच्या प्रोडक्शनमध्ये कार्यरत (third)होती. गौरी आमिर खानच्या कुटुंबीयांनाही भेटलेली आहे. त्यामुळे या दोघांच्या नात्याबाबत कुटुंबातून काहीच अडचण नसल्याचं सांगितलं जात आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गौरी आमिर खानला सुपरस्टार मानत नाहीये.
आधीच दोन तलाक
आमिर खानने 1986मध्ये रिना दत्तासोबत पहिला निकाह केला होता. 16 वर्ष दोघांनी संसार केला. त्यानंतर 2002मध्ये दोघे वेगळे झाले. पहिल्या बायकोकडून आमिरला इरा आणि जुनैद ही दोन मुले आहेत. त्यानंतर 2005मध्ये त्याने किरण रावशी निकाह केला. हे लग्नही जास्त काळ टिकलं नाही. दोघांनी 2021मध्ये तलाक घेतला. आमिर आणि किरणला आजाद नावाचा मुलगा आहे. तर आमिर आणि गौरीचं नातं गेल्या दोन ते तीन वर्षापासूनचं आहे.
हेही वाचा :
ठाकरे गटाला धक्का ! ‘या’ फायरब्रँड महिला नेत्याचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
उन्हाळ्यात काकडीचा रायता खाताय? तर ‘ही’ बातमी वाचाच
परीक्षेसाठी पत्नी बाहेरगावी गेल्यावर पतीने मेव्हणीसोबत केलं लग्न; नंतर बायकोला व्हिडिओ कॉल केला अन्…