१७८ प्रवासी असलेल्या विमानाला भीषण आग; लँडिंग करताच फ्लाइटने घेतला पेट

अमेरिकेच्या डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. डॅलस-फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट 1006 या विमानाच्या(plane) इंजिनने विमानतळावर उतरल्यानंतर अचानक पेट घेतला. या विमानात १७८ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर होते.

मिळालेल्या माहितीनुसार, इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे विमानाला डेन्व्हरला वळवण्यात आले होते. विमान सुखरूप उतरले, मात्र C-38 गेटवर उभे राहिल्यानंतर इंजिनमधून धूर निघू लागला. त्यानंतर अचानक आग लागल्याची घटना घडली.

विमानतळावरील(plane) अधिकाऱ्यांनी आणि अमेरिकन एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्याची माहिती मिळताच विमानातील सर्व प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले आणि सुरक्षितपणे टर्मिनलवर हलवण्यात आले. विमानतळावरील अग्निशमन दलाने तत्काळ कारवाई करत आग आटोक्यात आणली.

या घटनेमुळे विमानतळावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेच्या चौकशीसाठी अधिकृत तपास सुरू करण्यात आला आहे.

याआधीही काही वेळा अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या घटनेनंतर विमान कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हेही वाचा :

ट्रिपल सीट अन् नियमांची पायमल्ली; भर रस्त्यात तरुण-तरुणींचे अश्लील चाळे, Video Viral

Cigarette ओढल्यामुळे खरचं मानसिक तणाव कमी होतो का जाणून घ्या

आमिर खान एका लेकराच्या आईच्या प्रेमात, तिसऱ्यांदा करणार निकाह?