आधी रोहित आता माधुरीबद्दल वादग्रस्त विधान; विधानसभेत काँग्रेस नेता म्हणाला, ‘दुय्यम दर्जाची..’

काँग्रेसच्या महिला नेत्याने(Congress leader) भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मावर वजनावरुन टीका केल्यानंतर आता पक्षाच्या अन्य एका नेत्याने वादग्रस्त विधान केलं आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षितसंदर्भात विधानसभेमध्ये काँग्रेसच्या नेत्याने केलेल्या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत.

राजस्थान विधानसभेतील विरोधीपक्ष नेते टीका राम जुली यांनी राज्य सरकारवर निशाणा साधताना ‘इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स’ (आयफा) या सोहळ्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्य सराकरने 100 कोटींहून अधिक निधी दिल्याचं जुली म्हणाले. 8 आणि 9 मार्च रोजी जयपूरमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र यावर राज्य सरकारने गरजेपेक्षा जास्त खर्च केल्याचा आक्षेप विरोधीपक्षाने नोंदवला.

‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांच्या यादीवरुन जुली यांनी टीक केली. या सोहळ्याला बॉलिवूडमधील कोणतेही मोठे कलाकार उपस्थित नव्हते असं विरोधीपक्ष नेते(Congress leader) म्हणाले. भाजपाच्या आमदाराने या सोहळ्याला अभिनेत्री माधुरी दीक्षित उपस्थित होती असा उल्लेख केलेला.

यावरुनच जुली यांनी निशाणा साधताना एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या माधुरी दीक्षितचा ‘दुय्यम दर्जाची अभिनेत्री’ असा उल्लेख केला. “फक्त शाहरुख खान हा फर्स्ट ग्रेड कलाकार कार्यक्रमाला उपस्थित होता,” असं ‘आयफा’ला उपस्थित राहिलेल्या कलाकारांबद्दल बोलताना जुली म्हणाले. यावरुन आता भाजपाने आक्षेप घेत जुली यांनी सांभाळून शब्द वापरायला हवेत असं म्हटलं आहे.

“‘आयफा’चा आपल्याला काय फायदा झाला? किती मोठे कलाकार या कार्यक्रमाला आले होते? त्यांनी पर्यटनस्थळांना भेट दिली का? ते कोणत्याही पर्यटनस्थळावर गेले नाहीत. शाहरुख खान वागळता कोणता मोठा कलाकार या कार्यक्रमासाठी आलेला? सगळे दुय्यम दर्जाचे कलाकार आळे होते. एकही अव्वल दर्जाचा कलाकार कार्यक्रमाला नव्हता,” असं जुली म्हणाले.

काँग्रेसच्या नेत्या(Congress leader) आणि प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल आपल्या एक्स अकाऊंटवरुन वादग्रस्त विधान केलं होतं. रोहित शर्माचा ‘ओव्हरवेट’ असा उल्लेख करताना, “भारताला मिळालेला सर्वात अनइम्प्रेसिव्ह कर्णधार” असं म्हणत हिणवलं होतं. शमा मोहम्मद यांनी केलेल्या टीकेवरुन बराच वाद झाला होता.

अनेकांनी रोहित शर्मासारख्या बड्या क्रिकेटपटूबद्दल असं विधान करणं योग्य नसल्याचं म्हटलं होतं. हा वाद शांत होत असतानाच आता माधुरीबद्दल काँग्रेसच्या नेत्याने केलेल्या विधानाने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. यावरुन आता काँग्रेस पुन्हा अडचणीत आल्याचं चित्र दिसत आहे.

हेही वाचा :

१७८ प्रवासी असलेल्या विमानाला भीषण आग; लँडिंग करताच फ्लाइटने घेतला पेट

Cigarette ओढल्यामुळे खरचं मानसिक तणाव कमी होतो का जाणून घ्या

ट्रिपल सीट अन् नियमांची पायमल्ली; भर रस्त्यात तरुण-तरुणींचे अश्लील चाळे, Video Viral