चंदगडमध्ये बिबट्याची(Leopard) शिकार करून त्याचे कातडे विक्रीसाठी कोल्हापूरातील तपोवन मैदान परिसरात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हे कातडे एका प्लास्टिक पोत्यात ठेवून मोटारसायकलवर आणले जात होते.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कंळबा रोडवर संशयितांना पकडले. सुरुवातीला त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी अधिक तपास केला असता प्लास्टिक पोत्यात बिबट्याचे(Leopard) कातडे आढळले. यानंतर दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू करण्यात आली.
पोलिसांनी या संशयितांच्या ताब्यातून एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, ज्यामध्ये बिबट्याचे कातडे, ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल आणि १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल यांचा समावेश आहे. या दोघांवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. वन्यजीव संरक्षणासाठी पोलिस प्रशासन कठोर पावले उचलत असून, अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी अधिक उपाययोजना केल्या जात आहेत.
हेही वाचा :
दुही माजवण्यासाठीच होतोय इतिहासाचा वापर?
आधी रोहित आता माधुरीबद्दल वादग्रस्त विधान; विधानसभेत काँग्रेस नेता म्हणाला, ‘दुय्यम दर्जाची..’
१७८ प्रवासी असलेल्या विमानाला भीषण आग; लँडिंग करताच फ्लाइटने घेतला पेट