होळीच्या निमित्ताने दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. काही दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीने त्यांच्या नव्या कर्णधाराची(captain) घोषणा केली असून ऑल राउंडर अक्षर पटेलकडे संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. मागील अनेक दिवसांपासून दिल्लीचा नवा कर्णधार कोण असणार याबाबत चर्चा सुरु होती. अखेर 2019 पासून संघाचा भाग असणाऱ्या अक्षर पटेलला दिल्लीने संघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार(captain) ऋषभ पंत याला फ्रेंचायझीने आयपीएल 2025 पूर्वीच्या मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन केलं नाही. ऑक्शनमध्ये पंतला खरेदी करण्यासाठी दिल्लीने बोली लावली मात्र लखनऊने आयपीएलकच्या इतिहासातील सर्वात मोठी 27 कोटींची बोली लावून पंतला आपल्या संघात घेतले. तर लखनऊचा माजी कर्णधार केएल राहुलवर दिल्ली कॅपिटल्सने बोली लावली आणि त्याला संघात सामील केले.
आयपीएल 2025 साठी केएल राहुल हाच दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार असेल असं म्हटलं जात होतं, मात्र केएल राहुलने स्वतः कर्णधारपद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला नवा कर्णधार शोधावा लागणार होता.
2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेल या आपल्या संघात सामील करून घेतले होते. तर आयपीएल 2025 साठी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मेगा ऑक्शनपूर्वी त्याला तब्बल 16.50 कोटींना विकत घेण्यात आले. अक्षर पटेल याला कर्णधारपदाचा जास्त अनुभव नाही, परंतु जानेवारीमध्ये टी 20 सीरिजमध्ये तो भारतीय संघाचा उपकर्णधार होता. 31 वर्षीय अक्षरने 23 सामन्यांमध्ये गुजरात संघाचं नेतृत्व केलं होतं.
2024-25 मध्ये सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुद्धा अक्षर पटेलने गुजरातच नेतृत्व केलं होतं. मागील वर्षी सुद्धा अक्षर पटेलने एका सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व केलं होतं, जेव्हा स्लो ओव्हर रेटमुळे पंतवर एक सामन्याचा बॅन लावण्यात आला होता. परंतू त्या सामन्यात दिल्लीचा पराभव झाला होता आणि त्यामुळे प्लेऑफमध्ये क्वालिफाय होण्याची संधी हुकली होती.
ऋषभ पंतनंतर अक्षर पटेल हा दिल्ली कॅपिटल्समधील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याने सहा सीजनमध्ये दिल्लीसाठी एकूण 82 सामने खेळले असून मागील वर्षी जवळपास 30 च्या सरासरीने त्याने 235 धावा केल्या होत्या. तर 11 विकेट्स सुद्धा घेतले होते. अक्षर पटेल सोबत यंदा आयपीएल संघांचे नेतृत्व केलेले दोन माजी कर्णधार असतील. यात केएल राहुलचा समावेश असून आरसीबीचे नेतृत्व करणारा फाफ डू प्लेसिस सुद्धा यंदा दिल्लीचा भाग आहे.
हेही वाचा :
होळीचा मोह बैलालाही आवरता आला नाही, थेट गर्दीत शिरला अन् … Video Viral
कोल्हापूरात बिबट्याची कातडी पोत्यात भरली, विक्रीसाठी बाजार गाठलं अन्…
आधी रोहित आता माधुरीबद्दल वादग्रस्त विधान; विधानसभेत काँग्रेस नेता म्हणाला, ‘दुय्यम दर्जाची..’