बीडमधून पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

बीडचा बिहार झाला आहे का? असे म्हणायची वेळ आली (beating)आहे. कारण, कोर्टाच्या बाहेर जोरदार राडा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बीडच्या कायदा सुवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. दररोज मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आजही बीडमधील मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

बीडमधील धारूरच्या न्यायालय परिसरात मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जमिनीच्या व्यवहारासाठी (beating) आलेल्या लोकांमध्ये जोरदार राडा झाल्याचा व्हिडीओ बीडमध्ये वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.बीड जिल्ह्यामध्ये दररोज नवनवीन हाणामारीचे व्हिडिओ सोशल माध्यमावरती व्हायरल होत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर हे व्हिडिओ समोर येताना पाहायला मिळत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का?

बीडचा बिहार झाला आहे का? असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत. अशातच बीडच्या धारूर तालुक्यातील तालुका न्यायालयामध्ये जमिनीचे व्यवहारातून मारहाण झाल्याचे (beating)समोर आले आहे. धारूर येथील जिल्हा सत्र न्यायालय मध्ये ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे. एका जमावाकडून मारहाण केल्याचे निष्पन्न झाले आहे, या मारहाण प्रकरणी धारूर पोलिसांमध्ये सुमोटोनुसार सात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती धारूर पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा :

ठाकरे गटाला धक्का ! ‘या’ फायरब्रँड महिला नेत्याचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

उन्हाळ्यात काकडीचा रायता खाताय? तर ‘ही’ बातमी वाचाच

परीक्षेसाठी पत्नी बाहेरगावी गेल्यावर पतीने मेव्हणीसोबत केलं लग्न; नंतर बायकोला व्हिडिओ कॉल केला अन्…

आमिर खान एका लेकराच्या आईच्या प्रेमात, तिसऱ्यांदा करणार निकाह?

ट्रिपल सीट अन् नियमांची पायमल्ली; भर रस्त्यात तरुण-तरुणींचे अश्लील चाळे, Video Viral