ग्राहकांनो, महिंद्रा थार, स्कॉर्पिओ एनवर बंपर सूट, होणार तब्बल 1.5 लाखांची बचत

भारतीय ऑटो कंपनी महिंद्राने विक्री वाढवण्यासाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. ज्याची चर्चा सध्या संपूर्ण बाजारात होत आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये महिंद्रा(Mahindra) थार, स्कॉर्पिओ एन सारख्या लोकप्रिय कार्स स्वस्तात खरेदी करू शकतात. कंपनीने मार्च 2025 मध्ये ही ऑफर जाहीर केली आहे. ऑफर फक्त 2024 आणि 2025 च्या मॉडेल्सवर उपलब्ध असणार आहे.

Mahindra Thar
कंपनीने महिंद्रा(Mahindra) थारच्या 2024 मॉडेलवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट जाहीर केली आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही 4WD च्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंट घरी आणू शकतात. तर दुसरीकडे थार 2WD डिझेल व्हेरियंटवर 50,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे आणि थार 2डब्ल्यूडी पेट्रोल व्हेरियंटवर तब्बल 1.25 लाखांपर्यंत सूट देण्यात येत आहे.

Scorpio-N
महिंद्रा थारसह कंपनी 2024 महिंद्रा स्कॉर्पिओ एन च्या बेस व्हेरिएंट Z2 वर देखील बंपर सूट देत आहे. कंपनी या कारवर 55,000 पर्यंतचे ऑफर देत आहे. तर टॉप-स्पेक Z8S वर 60,000 पर्यंतची सूट देण्यात येत आहे आणि Z8 आणि Z8L ट्रिम्सवर 80,000 पर्यंत सूट उपलब्ध आहे. याचबरोबर तर Z6 डिझेल आणि Z4 ट्रिम्सवर 90,000 पर्यंत सूट उपलब्ध मिळणार आहे. तर दुसरीकडे 2025 च्या स्कॉर्पिओच्या Z2, Z4, Z8, Z8L आणि Z8S पेट्रोल व्हेरियंटवर 40,000 पर्यंत सूट मिळत आहे. तर डिझेल च्या Z4 आणि Z6 ट्रिम्सवर 30,000 पर्यंत सूट मिळत आहे.

भारतीय बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकचा 2024 च्या मॉडेलवर 1.25 लाखांपर्यंतची सूट देण्यात आली आहे. तर स एस ट्रिमवर 1.25 लाखांपर्यंत ऑफर देण्यात येत आहे. तर टॉप-स्पेक S11 व्हेरिएंटवर 90,000 पर्यंतची सूट मिळते. याच बरोबर 2025 स्कॉर्पिओ क्लासिकच्या एस व्हेरिएंटवर 90,000 पर्यंतची सूट मिळते, तर S11 वर 44,000 पर्यंतची सूट मिळत आहे. कार खरेदी करण्यापूर्वी ऑफरबद्दल संपूर्ण माहिती डीलरशी जाणून घ्या. प्रत्येक शहरात डिस्काउंट किमतीमध्ये बदल असू शकतो.

हेही वाचा :

काय खरं, काय खोटं? बेटावर रक्तासारखा पूर; VIDEO viral

Water Diet च्या नादात 18 वर्षाच्या तरुणीने गमावला जीव

स्पा-मसाजच्या नावाखाली गुपचूप सुरु होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी धाड टाकताच झाला भांडाफोड