दररोज कोट्यवधी लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांच्या(Railways) सोयीसाठी भारतीय रेल्वेने काही नियम बनवले आहेत. भारतीय रेल्वेसाठी तिकीट बुकिंग करताना मुले, महिला, वृद्ध आणि अपंगांना विशेष सवलती दिल्या जातात. त्यांच्या वयानुसार, काही मुलांना रेल्वे तिकिटे काढण्याची आवश्यकता नसते.तसेच काहींनी अर्धी तिकिटे काढली तरी ते नियमात बसते. पण याबद्दल अनेकांना माहिती नसते. कोणत्या वयापर्यंत मुले ट्रेनमध्ये मोफत प्रवास करू शकतात आणि कोणत्या वयाच्या मुलांसाठी तुम्हाला अर्धे तिकीट घ्यावे लागेल? याची माहिती करुन घेऊया.

कोणत्या वयापर्यंत मुलांना रेल्वे तिकिटे खरेदी करण्याची आवश्यकता नसते, याबद्दल भारतीय रेल्वेने नियम आखले आहेत. जर तुमचे मूल 1 ते 4 वर्षांचे असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी कोणतेही तिकीट खरेदी करावे लागणार नाही. याचा अर्थ तुम्ही 4 वर्षापर्यंतच्या बाळाला सोबत घेऊन गेलात तर त्याचा प्रवास मोफत असतो.ज्यांना लहान मुले आहेत, अशा लोकांसाठी हा नियम खूप फायदेशीर ठरतोय.
भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार जर तुमचे मूल 5 ते 12 वर्षांच्या दरम्यान असेल आणि तो तुमच्यासोबत ट्रेनमध्ये प्रवास करत असेल, तर तुम्हाला त्याच्यासाठी अर्धे तिकीट खरेदी करावे लागेल. असे असले तरी मुलांना अर्ध्या तिकिटात बर्थ दिला जात नाही. तुम्हाला मुलांना स्वतःच्या सीटवरच बसवावे (Railways) लागेल. जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी वेगळी सीट हवी असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी पूर्ण तिकीट बुक करावे लागेल.
तुमचे मूल तुमच्यासोबत मोफत प्रवास करण्याइतके मोठे असले तरीही तुम्हाला त्याच्यासाठी पूर्ण जागा हवी असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी पूर्ण तिकीट बुक करावे लागेल. पण जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर तुम्हाला तुमच्या सीटवर त्याला जागा द्यावी लागेल.
जर तुमचे मूल 13 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे असेल. तर तुम्हाला त्याच्यासाठी पूर्ण तिकीट खरेदी करावे लागेल. हाफ तिकिटाचा नियम फक्त 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लागू आहे.
जर तुम्हाला रेल्वेच्या या नियमाचा फायदा घ्यायचा असेल तर मुलांसाठी तिकिटे बुक करताना तुम्हाला त्यांचे जन्म प्रमाणपत्र आणि इतर ओळखपत्रे द्यावी लागतील. मुलाचे खरे(Railways) वय कळावे आणि लोक मुलाचे वय लपवून या नियमाचा गैरवापर करू नये म्हणून ही कागदपत्रे मागितली जातात.
जर तुमचे मूल 5 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी तिकीट घ्यावे लागेल. तुम्ही त्याचे तिकीट न घेता ट्रेनमधून प्रवास करत असाल आणि पकडले गेल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. तुमचे मूल 4 वर्षांपेक्षा कमी वयाचे असले तरी ते सिद्ध करण्यासाठी तुम्हाला त्याचे/तिचे जन्म प्रमाणपत्र तुमच्यासोबत ठेवावे लागेल.
हेही वाचा :
ठाकरे गटाला धक्का ! ‘या’ फायरब्रँड महिला नेत्याचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
उन्हाळ्यात काकडीचा रायता खाताय? तर ‘ही’ बातमी वाचाच
परीक्षेसाठी पत्नी बाहेरगावी गेल्यावर पतीने मेव्हणीसोबत केलं लग्न; नंतर बायकोला व्हिडिओ कॉल केला अन्…
आमिर खान एका लेकराच्या आईच्या प्रेमात, तिसऱ्यांदा करणार निकाह?
ट्रिपल सीट अन् नियमांची पायमल्ली; भर रस्त्यात तरुण-तरुणींचे अश्लील चाळे, Video Viral