कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूर सांगली महामार्ग(highway) बेमुदत रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आज सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याची धरपकड सुरू करण्यात आली आहे. अनेक कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला डांबून नेण्यात आलं आहे. राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी पोलिसांचा ताफा पोहोचला. त्यांना कडक बंदोबस्तामध्ये कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे.

दरम्यान, पोलिसांकडून दबाव टाकून कार्यकर्त्यांना ताब्यात घेवू लागले आहेत. कालपासून पोलिस आंदोलन मिटविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून कोणतीच हालचाल झालेली नाही. रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या(highway) आज होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांना पहाटेपासून ताब्यात घेण्यास सुरवात केली आहे.
नागपूर महामार्गातील शेतजमीनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना चौपट मोबदला द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगली-कोल्हापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील टोलनाक्यावर सांगली-कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखून धरून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यापूर्वीच पोलिसांनी राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनच्या ठिकाणी तरी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
दरम्यान राजू शेट्टी यांनी रत्नागिरी नागपूर महामार्गातील चोकाक ते अंकली या बाधित गावांमधील उदगाव व उमळवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मोजणी करणार आहेत. त्यामुळे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पळवून लावा. जे अधिकारी शेतामध्ये खुणा करतील त्या खुणा उपसून टाका. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. उपोषणकर्त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा थांबणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
दरम्यान, शिरोळ तालुक्यातील जैनापुरात रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चोकाक ते उदगाव बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई आणि उदगाव बायपाससाठी कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील शेतकऱ्यांसह उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. रत्नागिरी नागपूर महामार्गातील बाधित शेतकऱ्याचा उपोषणाचा पाचवा दिवस असून तब्येत खालावली आहे. मात्र, प्रशासन दखल घेण्यास तयार नाही.
हेही वाचा :
इतका माज येतो कुठून? मद्यधुंद अवस्थेत तरुणाने चौघांना उडवलं Video Viral
महायुतीत नाराजीनाट्य, निधी वाटपावरून अजितदादांवर शिवसेनेनंतर भाजपही नाराज?
उसाचा रस की नारळाचे पाणी? उन्हाळ्यात काय पिणे ठरेल फायदेशीर