सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

सोने(gold) आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी ही महत्त्वाची संधी ठरू शकते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सोमवार, 17 मार्च 2025 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 89,660 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा(gold) दर 82,190 रुपये आहे. तसेच, चांदीचा दर 1,02,900 रुपये प्रति किलो पर्यंत खाली आला आहे.

दिल्ली: 22 कॅरेट – 82,340 रुपये, 24 कॅरेट – 89,810 रुपये
मुंबई: 22 कॅरेट – 82,190 रुपये, 24 कॅरेट – 89,660 रुपये
कोलकाता: 22 कॅरेट – 82,220 रुपये, 24 कॅरेट – 89,680 रुपये
चेन्नई: 22 कॅरेट – 82,500 रुपये, 24 कॅरेट – 89,950 रुपये
सोन्याच्या घसरणीमागची कारणे
गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर उच्चांक गाठल्यानंतर आता किंमतीत घसरण दिसून येत आहे. यामागील मुख्य कारणे म्हणजे:

डॉलरच्या मूल्यात वाढ – आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे.

अमेरिकेतील आर्थिक घडामोडी – फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे सोन्याचे दर आणखी कमी होऊ शकतात.

मागणी-पुरवठा तफावत – सध्या लग्नसराई आणि सण नसल्याने सोन्याची मागणी तुलनेत कमी आहे.

त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सध्याचा दर चांगली संधी असू शकते. मात्र, बाजारातील पुढील घडामोडी लक्षात घेऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

हेही वाचा :

तरुणाची निर्घृण हत्या; शरीराचे तुकडे वेगवेगळ्या विहिरीत सापडले

बारामतीत पुन्हा एकदा काका विरूद्ध पुतण्या? युगेंद्र पवार घेणार मोठा निर्णय!

सूरज चव्हाणच्या ‘झापूक झुपूक’ची पहिली झलक; ‘एका बुक्कीत टेंगुळ’ डायलॉगने घातला धुमाकूळ!