कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसह बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोधी पक्ष आणि शेतकऱ्यांकडून(farmers) जोराचा विरोध होताना दिसतो आहे. या महामार्गामुळे संबंधित 12 जिल्ह्यांचा विकास होणार आहे हे पटवून देण्यात राज्य शासन विशेषता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश मिळालेले आहे असे दिसत नाही. शेतकऱ्यांना भकास करून होणारा विकास हा कोणालाच नको आहे. शक्तिपीठ महामार्गाबाबत मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भूमिका कधी तळ्यात तर कधी मळ्यात अशी आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तिपीठ महामार्गाला 1 हजार शेतकऱ्यांचा(farmers) पाठिंबा असल्याचे सांगितले होते. पाठिंबा असलेल्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी ही त्यांनी दाखवली होती. यातील एक नाव खोटे निघाले तर मी म्हणेल ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे असे त्यांनी फडणवीस यांना सांगितले होते. त्याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींचा शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा असल्याचे सांगितले होते.
तथापि आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत बोलताना महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा (farmers) विरोध असल्याचे सांगितले होते. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण तयार झालेले असतानाच आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असेल तर माझा ना इलाज आहे, पण मी या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या बाजूने आहे असा यु टर्न घेतला आहे.
अमेरिका ही श्रीमंत आहे म्हणून इथले रस्ते चांगले आहेत असे नाही तर रस्ते चांगले असल्यामुळे अमेरिका श्रीमंत आहे हे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे लोकप्रिय विधान या शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात आवर्जून सांगितले जाऊ लागले आहे.
ज्या देशाचे रस्ते चांगले आणि मजबूत आहेत त्या देशाची प्रगती होते हे निर्विवाद सत्य असले तरी हजारो शेतकऱ्यांना विस्थापित करून होणारा विकास हा कोणालाही नको असतो. मराठवाड्यातील पाच जिल्हे आणि उर्वरित महाराष्ट्रातील म्हणजे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सात जिल्हे म्हणजे नागपूर ते सिंधुदुर्ग अशा बारा जिल्ह्यातून जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार असल्यामुळे औद्योगिक आणि आर्थिक विकास साधला जाणार असल्याचे राज्य शासनाचे म्हणणे आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून समृद्धी महामार्गाचे उदाहरण दिले जाते.
शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचा कसा आणि किती विकास होणार आहे हे पटवून देण्यात सरकार कमी पडत असल्यामुळे विरोधी पक्षांकडून या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात उभा केले जात आहे. या बारा जिल्ह्यातील शेतकरी उध्वस्त होणार असल्याचे चित्र विरोधी पक्षांकडून दाखवले जात आहे. मुंबईत मोर्चासाठी एकत्र आलेल्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ते अधोरेखित केले आहे.
नागपूर ते सिंधुदुर्ग हा 700 किलोमीटर लांबीचा शक्तिपीठ महामार्ग असून त्याचा प्रस्तावित खर्च 86 हजार कोटी रुपयांचा आहे. हा महामार्ग कोणत्याही स्थितीत पूर्ण करणारच असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला असला तरी, शेतकऱ्यांचा त्यास कळवा विरोध असेल तर तो कसा पूर्ण होणार? समृद्धी महामार्गामुळे संबंधित जिल्ह्यातील विकास कोणत्या प्रकारे झालेला आहे हे राज्य शासनाने पुराव्यासह, आर्थिक आकडेवारीसह महाराष्ट्राला विशेषता शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना(farmers) सांगितले पाहिजे. शिवाय बाजारभावापेक्षा पाचपट अधिक नुकसान भरपाई देवूनही सरकारने या शेतकऱ्यांना पर्यायी शेत जमिनी देऊन त्यांचे पुनर्वसन केले पाहिजे. तसा विश्वास दिला तरच शेतकरी या शक्तिपीठ महामार्गासाठी आपल्या जमिनी देतील.
भावी आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सुद्धा शक्तीपीठ महामार्गाला कळवा विरोध केलेला आहे. हा महामार्ग कोल्हापुरातून गेल्यास कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात तब्बल 40 दिवस पूरस्थिती असेल किंवा तो भाग जलमय होईल अशी भीती व्यक्त केली आहे. त्यांनी व्यक्त केलेली भीती अगदीच अनाठायी आहे असे म्हणता येणार नाही. आधीच अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावर कर्नाटकचे सरकार ठाम आहे अशा स्थितीत शक्तीपीठ महामार्गाचे आणखी एक संकट कोल्हापूर जिल्ह्याला परवडणारे नाही.
हेही वाचा :
नाम विस्ताराने काय होईल? शिवरायांचे नाव पुसले जाईल!
महाराष्ट्र सरकारची ‘ही’ योजना बंद होणार? नागरिकांना फटका बसणार
मासा खात असाल तर सावधान! हा धोकादायक आजार होऊ शकतो