इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन करणे तसेच छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या आहेत. अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रशांत कोरटकरने न्यायालयात(Court) अर्ज केला होता. पण न्यायालयाकडून त्याला दणका मिळाला आहे.

कोल्हापूर सेशन कोर्टात(Court) कालच या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली होती. इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे, सरकारी वकील आणि प्रशांत कोरटकर अशा तीनही पक्षकारांच्या वकिलांनी काल कोर्टात युक्तिवाद केला होता. कोर्टाने तीनही वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. अखेर कोल्हापूर सेशन कोर्टाने आज याबाबत निकाल सुनावला आहे. हा निकाल प्रशांत कोरटकर याला मोठा धक्का देणार आहे.
प्रशांत कोरटकर हा फरार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो पोलिसांच्या रडारवर आहे. पण तो पोलिसांना सापडत नाही. त्याने आपला मोबाईल पोलिसांकडे जमा केला आहे. पण तो पोलिसांच्या हाती सापडत नाही. त्याने कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष म्हणजे कोर्टाकडून त्याला दोन वेळा अंतरिम जामीन मिळाला. पण आता त्याला धक्का बसला आहे. कोर्टाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता त्याला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पोलीस आता कोरटकरला कधी ताब्यात घेतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
प्रशांत कोरटकरने सुरुवातीला तो मी नव्हेच, अशी भूमिका घेतली. ऑडिओ क्लिपमधील आवाज हा आपला नसल्याचा दावा कोरटकरने केला होता. त्यानंतर तो फरार झाला. यानंतर त्याने आपला मोबाईल पोलिसांकडे जमा केला. पण मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट करुन तो जमा करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत होता. विशेष म्हणजे कोरटकरने आपला मोबाईल हॅक झाल्याचा दावा केला होता. त्याच्या वकिलांनी काल कोर्टात त्याबाबतचा दावा केला होता. पण सरकारी वकिलांनी कोरटकरने आपल्याला मोबाईल हॅक झाल्याबाबतची कोणतीही माहिती दिली नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
अखेर या प्रकरणी कोल्हापूर सेशन कोर्टाने प्रशांत कोरटकरला धक्का दिला आहे. कोर्टाने कोरटकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्याला आता कधीही अटक होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर पोलिसांची विविध पथकं त्याच्या शोधासाठी रवाना होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
जिओची भन्नाट ऑफर! IPL 2025 फुकटात पाहता येणार
मुलीसाठी पैसे जमा करताय? मग आताच ‘या’ सरकारी योजनेत गुंतवा, खात्यात जमा होतील ७० लाख; नशीब चमकेल
सुनीता विल्यम्सच्या अडचणी काही थांबेना! लॅंडिंगवेळी पृथ्वीवर येताना अंतराळयानाचा होऊ शकतो स्फोट?