ऐन उन्हाळ्यात पावसाचा देण्यात आला इशारा; राज्यात पुढील तीन दिवस…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात उन्हाचा तडाखाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. असे असताना आता अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल झाल्याची माहिती दिली जात आहे. त्यानुसार, राज्यात पुढील तीन दिवस पावसाची(rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे ऊन पडत आहे. आता पावसाचा (rain)इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.

तसेच मुंबई, पुण्यासह सोलापूर, नाशिक आणि कोकणात उन्हाची झळ लागण्याची शक्यता आहे. विदर्भात अकोला आणि अमरावती वगळता सर्वच जिल्ह्यामध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यात कडाक्याचे उन पडत आहे. अनेक जिल्ह्यातील तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्याचे दिसून आले. या उन्हामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे, त्यातच आता काही जिल्ह्यात अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे.

आता देशात कमालीचा बदल जाणवत आहे. तापमानातही चढ-उतार होऊ शकतो, असा अंदाज आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याने सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तसेच या ठिकाणी वीज कोसळण्याची शक्यता लक्षात घेता, खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा :

यड्राव : शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; संतापाची लाट

‘गल्लीत राहायचं असेल तर एक लाख दे!’ आधी धमकी मग घरावर दगडफेक, कारही फोडली

‘लाडक्या बहिणी’चे पैसे पतीने दारुवर केले खर्च; जाब विचारताच पत्नीवर कोयत्याने वार