शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू आक्रमक; रायगडाच्या पायथ्याला करणार अन्नत्याग आंदोलन

रायगड : प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी(farmers) बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उद्यापासून प्रहार संघटना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहे. आंदोलनाची घोषणा बच्चू कडू यांनी केली असून यामुळे राज्य सरकारपुढे आणखी अडचणी वाढणार आहेत.

उद्यापासून (दि. २१ मार्च)पासून दिव्यांग मंत्रालयाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. पुढील तीन दिवस हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे(farmers). तसेच २३ मार्च शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी हे आंदोलन होईल,अशी माहिती संयोजक सचिन साळुंखे व ओंकार साळुंखे यांनी दिली आहे.

प्रहार संघटनेचे संयोजक सचिन साळुंखे म्हणाले, “शुक्रवार, दि. २१ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून प्रहार नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अन्नत्याग आंदोलन सुरु होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या राजधानीवरून राज्याच्या राजधानीला इशारा देण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन आहे.

दिव्यांगांना, कर्जमाफी, त्यांना दरमहा सहा हजार रुपये मानधन, स्वतःचे घर व स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी, स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना स्टॉल, दिव्यांगांसाठी राष्ट्रीय बँक निधी, दिव्यांग उद्योजकांसाठी धोरण, प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन, अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे.” अशी माहिती प्रहार संघटनेचे संयोजक सचिन साळुंखे यांनी दिली आहे.

‘बुरा नो मानो होली है’ म्हणत कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी निशाणा साधला होता. तसेच कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आमच्यासोबत युती करा अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद देतो अशी ऑफर देखील नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिली.

यावर आता बच्चू कडू यांनी कॉंग्रेस नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. बच्चू कडू म्हणाले की, नानाभाऊंची ही ऑफरच मोठी हास्यास्पद आहे. काँग्रेसच सध्या स्थिर आहे की नाही हे समजत नाही. काँग्रेसचे 20 आमदार आहेत, तर एक तर आताच शिंदे गटात गेले आहेत. नाना पटोले यांची ऑफर चांगली आहे. पण त्यांनी काँग्रेस कुठंय ते शोधलं पाहिजे असा खोचक टोला बच्चू क़डू यांनी नाना पटोले यांना लगावला.

हेही वाचा :

सांगली जिल्ह्यात अजितदादांची पावर वाढणार! चार माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार

वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी वाऱ्यांचा वेग वाढणार ढगांचा गडगडाट होणार

खोटं, लोभ अन् फसवणूक.. आरजे महवशचा धनश्रीला टोमणा? चहलकडून पोटगी मागितल्यानंतरची पोस्ट