गेले काही महीने झाले युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा (mask)त्यांच्या घटस्फोटाबाबत चर्चेत आले आहेत. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा गेल्या अडीच वर्षांपासून वेगळे राहत होते. मीडिया रिपोर्ट्सवर चहल आणि धनश्री लग्नाच्या दोन वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे राहत असल्याची माहिती मिळत आहे. दोघांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता मीडिया रिपोर्ट्समधील दाव्यांनंतर भारताचे स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. 20 मार्च रोजी वांद्रे फॅमिली कोर्टाकडून दोघांचा घटस्फोट मंजूर करण्यात आला. यानंतर चहल खूपच खचलेला दिसून आला आहे.

गेले अनेक दिवसांपासून चहल आणि धनश्री वेगळे झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या, त्यानंतर हे दोघेही बऱ्याच दिवसांपासून वेगळे राहत असल्याचे देखील समोर आले होते. त्यानंतर गेल्या गुरुवारी दोघांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. अशा परिस्थितीत आता सोशल मीडियावर चहलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये चहल आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करण्यात(mask) येत आहे.
डिसेंबर 2020 मध्ये लग्नगाठ
चहल आणि धनश्री यांचे डिसेंबर 2020 मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर आता 2025 मध्ये दोघांचा घटस्फोट देखील झाला आहे. घटस्फोट मंजूर झाल्यानंतर चहल कोर्टातून बाहेर आला तेव्हा तो खिन्न यानी उदास दिसून आला आहे. ज्यानंतर त्याच्या चाहत्यांना असे वाटत आहे की, त्याने मास्कमागे आपले अश्रू लपवले आहे. कारण चहलच्या चाहत्यांना असे वाटते की, धनश्रीने त्याचा विश्वासघात केला आहे.
#YuzvendraChahal visited the court wearing a tshirt: Be your own Sugar Daddy
— Bollywood Talkies March 20, 2025
This is the most savage alimony hearing move I have ever seen #dhanashreeverma pic.twitter.com/pqO15CjtXY
धनश्रीला पोटगी म्हणून 4.75 कोटी
धनश्रीपासून वेगळे झाल्यानंतर चहलने धनश्रीला पोटगी (mask)म्हणून 4.75 कोटी रुपये देण्यास होकार दिला आहे. यापूर्वी 60 कोटी रुपये मागितल्याची बातमीही समोर आली होती. पण, आता चहल ४.७५ कोटींची पोटगी देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 2.37 कोटी रुपये देऊन झाले आहेत. तर उर्वरित रक्कम त्यांना द्यायची आहे.
युझवेंद्र चहलच्या अफेअरच्या चर्चा..
युझवेंद्र चहलच्या अफेअरच्या देखील चर्चा होऊ लागल्या आहेत. सध्या चहलचे नाव त्याची मैत्रीण आरजे महवेशसोबत जोडले जात आहे. या दोघांनाही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहण्यात आले आहे. अशा परिस्थितीत चहलने धनश्रीची फसवणूक केल्याचेही अनेकांचे मत आहे. मात्र, धनश्रीने केवळ पैशासाठी चहलशी लग्न केल्याचेही काही लोकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा :
मार्चचा शेवटचा आठवडा गेमचेंजर ठरणार! ‘या’ 3 राशींचा गोल्डन टाईम सुरू
प्रियकरासह समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी आली होती प्रेयसी, पण… Video Viral
‘खल्लासच करतो’ म्हणत तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हा