उन्हाळा सुरु झाला की थंड पाण्याच्या मागणीत मोठ्या (careful)प्रमाणात वाढ होते. सर्वसामान्य दुकानदार ते मोठ-मोठ्या लग्नांमध्ये किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमांमध्ये थेट थंड पाण्याचे जार सर्रास वापरले जातात. मात्र हे जार आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. बाजारात मिळणारे हे थंड पाण्याचे जार 15 ते 20 लिटरचे असतात. 20 रुपयांपासून ते पन्नास रुपये पर्यंत मिळणारे हे जार छोट्या मोठ्या हॉटेल व्यवसायिकांसाठी उत्तम पर्याय असतात. त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांसाठी थंड पाण्याचा हा उत्तम स्त्रोत असतो.

मात्र हे पाणी फ्रीजिंग टेक्नोलॉजीने थंड केलेले नसते तर चक्क एका केमिकलचा वापर करून हे पाणी थंड करण्यात येते. या केमिकलचे नाव एथिलीन ग्लाइकॉल असे आहे. बाजारात मिळणाऱ्या या केमिकलमुळे कुठल्याही पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट हा कमी होतो. म्हणजेच तातडीने पाणी थंडगार होते. जोपर्यंत हे केमिकल त्या पाण्यामध्ये आहे तोपर्यंत पाणी थंडगार राहते.
एथिलीन ग्लायकॉलमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम
आयुर्वेदात उन्हाळ्यात थंडगार पाणी पिल्यामुळे शरीरावर (careful)अपायकारक परिणाम होत असल्याचा चरक संहितेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, एथिलीन ग्लायकॉलचा वापर करून थंड केलेल्या पाण्यामुळे अनेक जणांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यातच थंड पाण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक जार हे निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकचे असतात. त्यापासून एथिलीन ग्लाइकॉलच्या संयुगामुळे ते अधिक टॉक्सिक बनतात.
त्यामुळे उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याचे आकर्षण टाळून माठातलं पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड केलेलं पाणी पिण्याकडे कल असला पाहिजे. आज यामुळे तात्काळ परिणाम दिसत नसला (careful)तरी प्रतिकारक्षमता कमी झाल्यानंतर आजार तोंड वर काढताना हे नक्की.

माठातील पाणी पिण्याचे फायदे
पाणी साठवण्यासाठी माठ वापरण्याचे प्राथमिक कारण ते नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत करते. माठातले पाणी हे तुमचे आरोग्य निरोगी ठेवते. माठातील पाणी पिण्याचे शारीरिक आणि मानसिक फायदे अनेक आहेत. शुद्धता, त्वचेसाठी फायदेशीर, पचनक्रिया सुधारण्यास मदत करणे, हाडांची मजबूती वाढवणे, मानसिक शांती यासारखे अनेक फायदे माठाच्या पाण्यामुळे होतात.
हेही वाचा :
मार्चचा शेवटचा आठवडा गेमचेंजर ठरणार! ‘या’ 3 राशींचा गोल्डन टाईम सुरू
प्रियकरासह समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी आली होती प्रेयसी, पण… Video Viral
‘खल्लासच करतो’ म्हणत तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हा