रायगड जिल्ह्यात सध्या राजकीय(political) घडामोडींना वेग आला असून उद्धव ठाकरे गटासाठी ही वेळ चिंतेची ठरू शकते. महाडमधील त्यांच्या मजबूत उमेदवाराने आता राष्ट्रवादी गटात जाण्याची तयारी दर्शवली आहे, ज्यामुळे कोकणात राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रायगड जिल्ह्याच्या महाड मतदारसंघातील प्रमुख चेहरा स्नेहल जगताप या आता उद्धव ठाकरे गटाचा निरोप घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस(political) गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. या बाबतची अंतिम चर्चा आज सुतारवाडी येथे होणार आहे. या बैठकीस स्नेहल यांचे काका हनुमंत जगताप, तसेच सुनील तटकरे यांच्यात चर्चा अपेक्षित आहे. स्नेहल या बैठकीला उपस्थित नसल्या तरी हा पक्षप्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.
दरम्यान, यापूर्वी स्नेहल जगताप यांचा भाजपमध्ये जाण्याचा विचारही सुरू होता. मात्र, परिस्थिती बदलत गेल्याने त्यांनी राष्ट्रवादीकडे झुकाव दर्शवला आहे. महाडमध्ये भरत गोगावले यांच्याविरोधात त्यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी सुनील तटकरे यांनी त्यांना अप्रत्यक्ष पाठींबा दिल्याचा आरोप गोगावले यांनी केला होता.
महायुती सरकारने जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीमुळे शिवसेना मध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरत गोगावले आणि दादा भुसे यांना या यादीतून वगळण्यात आलं, तर अदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्त करण्यात आलं. यामुळे गोगावले यांच्या समर्थकांत रोष असून, स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा या पार्श्वभूमीवर तटकरे यांची मोठी खेळी मानली जात आहे.
या सर्व घटनांत उद्धव ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसणार आहे. आता स्नेहल जगताप राष्ट्रवादीत नेमकं कधी प्रवेश करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :
LIC ची जबरदस्त योजना, दरमहा मिळणार पेन्शन
महिलेने 3 वर्षांच्या मुलीला रेल्वे रुळावर ढकलले, काळजात धस्स करून जाईल हा Viral Video
कोल्हापूर :विशाळगडावर नेऊन मित्राचा चिरला गळा अन् दरीत फेकला मृतदेह