अनेकदा लहान मुलांना भात खायला आवडत नाही,(lemon)तर त्यांच्यासाठी हा सोपा आणि चवदार लेमन राईस तयार करु शकता. अनेक घरांमध्ये हा पदार्थ प्रवासाच्या वेळी किंवा झटपट जेवणासाठी लोकप्रिय आहे. तर जाणून घेऊया लेमन राईसची रेसिपी.

साहित्य:
1 कप तांदूळ, 2 चमचे तेल, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा हिंग, 2-3 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1/2 चमचा हळद, 1 टेबलस्पून चणा डाळ, 1 टेबलस्पून उडद डाळ, 10-12 कढीपत्त्याची पाने, लाल तिखट (आवडीनुसार), 2 चमचे लिंबाचा रस, मीठ (चवीनुसार), 2 चमचे शेंगदाणे
कृती:
तांदूळ चांगले धुवून 2 कप पाणी घालून कुकरमध्ये 2 शिट्या होईपर्यंत शिजवा. शिजवलेला तांदूळ मोकळा करा, जेणेकरून तो चांगला फुलतो. त्यानंतर एका कढईत(lemon) 2 चमचे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरं, मोहरी आणि हिंग घालून फोडणी द्या. त्यात चणा डाळ, उडद डाळ, शेंगदाणे आणि कढीपत्ता घालून 1-2 मिनिटे परतून घ्या, जेणेकरून डाळींचा रंग बदलेल. आता त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि हळद घालून परता. त्यात लाल तिखट आणि मीठ घालून एकत्र करा. त्यानंतर शिजवलेला भात फोडणीत घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करा. शेवटी लिंबाचा रस घालून 2 ते 3 मिनिटे छान परता. हा (lemon)गरमागरम लेमन राईस सर्व्ह करा. आवडत असल्यास त्यावर ताजी कोथिंबीरही घालू शकतात.

लेमन राईस हा एक हलका आणि चदिष्ट पदार्थ आहे, जो कोणत्याही वेळी आवडेल. त्यात वापरण्यात आलेल्या साध्या मसाल्यांमुळे त्याला एक वेगळी चव येते, जी लाहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते.
हेही वाचा :
कोल्हापूर :विशाळगडावर नेऊन मित्राचा चिरला गळा अन् दरीत फेकला मृतदेह
उन्हाळ्यात थंड जारमधील पाणी पिताय? आताच सावध व्हा! नाहीतर…
‘रेखा फक्त पैसे न देणाऱ्यांसोबत.. राकेश रोशन यांनी उघड केला खरा चेहरा