इचलकरंजी : माजी नगरसेवकासह तिघांना खंडणी प्रकरणी अटक

इचलकरंजी: बोगस सोने विक्रीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत दत्तवाड (ता. शिरोळ) येथील सराफाकडे पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी इचलकरंजीचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे, बाजीराव कुंभार आणि शहानवाज मुजावर या तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक(arrested) केली आहे. या प्रकरणी पंकज सुभाष दानवाडे (वय 29, रा. नदीवेस रोड, दत्तवाड) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

14 ते 18 मार्च 2025 या कालावधीत डायना स्टार सीएनसी मशिन वर्कशॉपजवळ असलेल्या एका ऑफिसवजा रूममध्ये फिर्यादी पंकज दानवाडे यांना बोलावण्यात आले. त्याठिकाणी शहानवाज मुजावर यांनी दानवाडे यांना धमकावत, “आत्ताच्या आता आम्हाला पाच लाख रुपये दे, नाहीतर येथून सोडणार नाही,” असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केली.

भीतीपोटी दानवाडे यांनी त्यांना 50 हजार रुपये दिले. त्यानंतर मनोज साळुंखे यांनी उर्वरित रक्कम आणण्यास सांगितले आणि धमकी दिली की, “जर पैसे दिले नाहीत तर तुझा व्हिडीओ व्हायरल करतो. पोलिसात जाऊ नकोस, माझ्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. तुझ्याकडे भरपूर पैसा आहे, त्यातील पाच लाख रुपये दे, नाहीतर तुला बोगस सोने विक्रीच्या गुन्ह्यात अडकवतो. तुझ्या कुटुंबालाही ठार मारेन.”

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मनोज साळुंखे, बाजीराव कुंभार आणि शहानवाज मुजावर या तिघांना अटक(arrested) केली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील यांनी याबाबत माहिती दिली. पोलिस अधिक तपास करत असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा :

“मुलगी दुसऱ्या घरी गेली तर…”, वडिलांनी स्वतःच्या मुलीशी केलं लग्न; व्हायरल व्हिडिओ

जिल्ह्यात धक्कादायक घटना! ‘या’ भागातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील बरणीत आढळले मृत अर्भक

सोनू निगमवर दगड आणि बाटल्या फेकण्यात आल्या, पुढे काय घडलं पाहा, VIDEO व्हायरल