अलीकडे रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या अपघातांचे अनेक व्हिडिओ(video) सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेकदा लोकांच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात घडतात. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, वेगाने गाडी चालवणे यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अनेक व्हिडिओतून अपघात किती जीवघेणे असतात हे स्पष्ट झाले आहे. तरीहि लोक सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. सध्या असाच एक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. एका कराचालकाच्या ओव्हटेक करण्याच्या चुकीमुळे भीषण अपघात घडला आहे. अगदी सेकंदात चित्रं बदलून गेले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(video) तुम्ही पाहू शकता की, हायवेवर गाड्यांची मोठ्या प्रमाणात रहदारी दिसत आहे. विशेष करुन ट्रकांची रहदारी दिसत आहे. याचदरम्यान एक कारचालक एका ट्रकला ओव्हटेक करण्याचा प्रयत्न करत असतो. तो दोन गाड्यांच्या मधून जाण्याचा प्रयत्न करतो. तिथून एखादी दूचाकी देखील जाऊ शकणार नाही अशा जागा असते. त्याच्या गाडीचा वेगही जोरदार असतो. गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी जोरात जाउन ट्रकला धडकते.
प्रचंड वेगामुळे गाडीचे नियंत्रण सुटते आणि ट्रकला धडकून गाडीचा चखनाचूर होतो. हा अपघात अगदी काही क्षणांत घडतो की कोणाला वाचवण्याचा प्रयत्नही करता आला नाही. ही सर्व घटना तिथूनच जाणाऱ्या एका कारमध्ये असलेल्या कॅमेरात कैद झाली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ(video) व्हान चालकांसाठी एक धडा आहे. यामुळए लोकांनी समजून घेतले पाहिजे की वाहतूकीच्या नियमांचे पालन न करणे किती धोकादायक ठरु शकते. यामुळे आपले व आपल्या कुटुंबाचे गंभीर नुकसान देखील होऊ शकते.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर@amanti_driving_school_trics या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसेच हा अपघात कुठे घडला याची काहीही माहिती नाही. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. नियमांचे पालन न करता वेगाने गाडी चालवणे किती धोकादायक आहे हे या व्हिडिओतून स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा :
इचलकरंजी : माजी नगरसेवकासह तिघांना खंडणी प्रकरणी अटक
ठाकरे गटाला मोठं खिंडार, ‘या’ बड्या नेत्यांचा आज शिंदेसेनेत पक्षप्रवेश
प्रशांत कोरटकर याचा पहिला अंक समाप्त…!