मुलांसमोरच दिराचा जबरदस्तीने वहिनीवर अत्याचार; पीडितेने केला अ‍ॅसिडने हल्ला…अन्…

दिराने भावजयीवर घरात घुसून मुलांसमोरच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने आरोपीच्या चेहऱ्यावर अॅसिड(acid) फेकलं त्यामुळे त्याचा चेहरा आणि डोळे भाजले आहेत. पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पीडितेचा पती दिल्लीतील एका खाजगी कंपनीत काम करतो. ती तिच्या दोन मुलांसह गावात राहते. सोमवारी रात्री ती तिच्या मुलांसह घरात होती. त्यानंतर आरोपीने तिच्या घरात घुसून बलात्कार केला. घटनेनंतर संतप्त झालेल्या पीडितेने घरात बाटलीत ठेवलेले अ‍ॅसिड(acid) त्याच्या चेहऱ्यावर फेकले. यामुळे त्याचा चेहरा जळाला.

बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. महेंद्र सिंग यादव नावाचा आरोपी पीडितेच्या घराजवळ राहतो, तो नात्याने तिचा दीर आहे. एफएसएल टीम घटनास्थळावरून नमुने गोळा करून प्रकरणाचा तपास करत आहे.

यानंतर प्रकारानंतर पीडितेने महेंद्र सिंह उर्फ ​​महेंद्र यादव याच्याविरुद्ध उदयवंतनगर पोलिस ठाण्यात नामांकित एफआयआर दाखल केला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली आणि घटनास्थळावरून पुरावे गोळा केले.

एसएचओ राम कल्याण यादव यांनी सांगितलं की, दिरावर घरात घुसून महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

हेही वाचा :

अवकाळीने झोडपले! सांगलीत वीज पडून महिलेचा मृत्यू…

क्षणांत होत्याचं नव्हतं झालं! ओव्हरटेक करायला गेला अन्…; भयानक घटनेचा VIDEO व्हायरल

कलाविश्वात शोककळा! ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 48 व्या वर्षी निधन