‘ओ, कलेक्टर गाड्या कुठे आहेत?’; अजित पवारांचा पारा चढला अन् ‘हा’ आदेशच देऊन टाकला

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(political updates) हे आपल्या आक्रमक आणि शिस्तप्रिय वागवणुकीमुळे नेहमीच चर्चेत असतात. प्रशासकीय कामांमध्ये काही त्रुटी असल्याचे लक्षात आल्यानंतर अजित पवारांनी अधिकाऱ्यांची वेळोवेळी खरडपट्टी काढल्याची अनेक उदाहरणेही समोर आली आहेत. त्यातच आता कोल्हापूर दौऱ्यावर असताना अजित पवारांनी जिल्हाधिकारी यांच्यावर संताप व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी कोल्हापूर(political updates) दौऱ्यावर आले आहेत. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास त्यांचे विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर कारने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ते रवाना झाले. यावेळी त्यांच्या ताफ्यातील एक वाहन खराब झाल्याची माहिती त्यांना मिळाली.

त्यामुळे अजितदादा चांगलेच संतप्त झाले. त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पोहताच ‘ओ कलेक्टर गाड्या कुठे आहेत’, अशी विचारणा केली. इतकेच नाही तर थेट ऑर्डरच देत दोन गाड्या घेऊन टाका, असा आदेशच दिला.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनामध्येच अशाप्रकारे बिघाड झाल्याने अजित पवार हे संतप्त झाले. त्यांनी तातडीने आदेश देत नव्या गाड्या घेण्याचे सांगितले. या घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

दुपारी सव्वातीनच्या सुमारास राष्ट्रवादी भवन, राजाराम स्टेडिअम, बंगला रोड, इचलकरंजी येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी व नागरिकांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी साडेचारच्या सुमारास इचलकरंजी महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचा आढावा घेणार आहेत.

हेही वाचा :

विमानतळावर महिलेचा नंगानाच पाहून प्रवाशी हादरले, पाहा व्हायरल व्हिडीओ!

भाजपच्या ‘या’ आमदाराची पक्षातूनच हकालपट्टी; सहा वर्षांसाठी काढून टाकलं

अभिनेत्याच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला, 7 लाखांचा मुद्देमाल लंपास