इचलकरंजी: शहरातील नागरिकांना सातत्याने भेडसावत असलेल्या पाणीपुरवठा(water) समस्येच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने उद्या सकाळी १०.३० वाजता महात्मा गांधी पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इचलकरंजी शहरासाठी २०२० साली तत्कालीन सरकारने सुळकुड पाणी योजना मंजूर केली होती. मात्र, या योजनेला काही राजकीय व्यक्तींनी विरोध दर्शवला. परिणामी, ही योजना अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही. विशेषतः मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही योजना इचलकरंजीसाठी योग्य नाही, असे वक्तव्य केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
यामुळेच इचलकरंजी नागरिक मंचने हा मुद्दा लावून धरत निदर्शनांचे आयोजन केले आहे. तसेच, सध्या शहरात ६ ते ८ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा(water) सुरळीत करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. महात्मा गांधी पुतळ्यासमोर होणाऱ्या या निदर्शनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शहराच्या पाणी समस्येचा प्रश्न गंभीर बनत असताना शासन व प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या आंदोलनानंतर प्रशासन काही ठोस पावले उचलते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याचं गुपित उघड? बच्चन म्हणाले, “ती माझी…”
सरकारी बँकेत नोकरीची संधी! बँक ऑफ बडोदामध्ये तरुणांसाठी मोठी भरती!
सांगली हादरली! दारुच्या नशेत नवऱ्याचं बायकोसोबत भयंकर कृत्य