उन्हाळ्यात उष्णतेमुळे अनेक समस्यांचा सामना (beard)करावा लागतो, ज्या मध्ये घाम येणे, खाज सुटणे आणि घामोळ्या येणे यासारख्या समस्यांचा समावेश आहे. त्यातच दाढी असणाऱ्यांना दाढीत खाज सुटणे हा एक मोठा त्रास होतो. हा असह्य त्रास अनेकदा चीडचीड आणि अस्वस्थतेचं कारण बनतो.

तुम्हालाही दाढीमध्ये खाज सुटते का? जर हो, तर या लेखात आम्ही तुमच्यासाठी काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत. यामुळे तुम्ही दाढीतील खाज कमी करू शकता आणि दाढीची देखभाल सोप्प्या पद्धतीने करू शकता. चला, जाणून घेऊया दाढीतील खाज कमी करण्याचे उपाय!
- मॉइश्चरायझ करा
दाढी ठेवणाऱ्यांसाठी मार्केटमध्ये विविध प्रकारचे ऑईल उपलब्ध आहेत, तसेच दाढीसाठी खास मॉइश्चरायझर देखील मिळतात. या मॉइश्चरायझरचा वापर तुम्ही दाढीवर (beard)नियमितपणे करावा. यामुळे दाढीची त्वचा ओलसर राहते आणि पाण्याच्या किंवा घामामुळे होणारी खाज कमी होण्यास मदत मिळते. - दाढीचा शॅम्पू वापरा
बाजारात दाढी स्वच्छ करण्यासाठी खास शॅम्पू उपलब्ध आहेत. दाढीच्या देखभालीसाठी याचा वापर करा. आठवड्यात तीन वेळा शॅम्पूने दाढी धुतल्यास खाज कमी होईल आणि दाढी स्वच्छ राहील. जर दाढीची स्वच्छता करूनही खाज जाणवत असेल, तर लिंबाच्या पानांचा वापर करा. लिंबाच्या पानांची पेस्ट तयार करा आणि ती पेस्ट दाढीवर लावा. काही वेळाने चेहरा धुऊन काढला तर तुम्हाला खाज कमी झालेली दिसेल.

3.एलोव्हेरा जेल
दाढीतील खाज कमी करण्यासाठी एलोव्हेरा जेल एक सोपा (beard)आणि प्रभावी उपाय आहे. ताज्या एलोव्हेरा जेलला दाढीवर लावा. तुम्ही ते जेल रात्रभर लाऊन झोपू शकता, यामुळे त्वचेची जळजळ कमी होईल आणि खाज शांत होईल. या लेखातील माहिती सामान्य माहितीनुसार आहे. याचा उद्देश वाचकांना माहिती आणि जागरूकता वाढवणे आहे. आम्ही या लेखातील माहितीबद्दल कोणताही दावा करत नाही आणि जबाबदारी घेत नाही. त्वचेच्या कोणत्याही समस्येसाठी, कृपया विशेषज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा :
लाडक्या बहिणीच्या 2100 रुपयांबद्दल सर्वात मोठी अपडेट समोर!
गर्ल्स हॉस्टेलला लागली आग, तरुणींनी चक्क दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी; थरारक घटनेचा Video Viral
जिथे नीती मूल्ये कमी पडतात तिथेच क्रूर गुन्हे घडतात!
हातावर मेहंदी, साखरपुड्यासाठी पाहुणे जमले पण नवरदेवाच्या अंत्ययात्रेला जाण्याची वेळ
चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश