कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर महाराष्ट्र हे अधिकृतपणे मराठी(Marathi) भाषिक राज्य बनले. आता तर गेल्याच वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. या एकूण पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मराठी भाषेचा सन्मान अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र मुंबईतील अमराठी भाषिकांकडून मराठीची अप्रतिष्ठा केली जात आहे.

आता मात्र मराठीची अप्रतिष्ठा खपवून घेणार नाही. मराठी(Marathi) न बोलणाऱ्या किंवा हिंदी मे बात करो असे म्हणणाऱ्या व्यक्तीच्या कानाखाली आवाज काढला जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने त्याचे स्वागत केले पाहिजे.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून मुंबईतील मराठी माणसाला प्राधान्य दिले. मराठी माणसाचे हित पाहिले. मराठी युवकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील मराठी माणसाचा टक्का कमी होता कामा नये अशी त्यांची भूमिका राहिली. महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य म्हणून घोषित करण्यात आले असल्याने मुंबईतील सर्वच दुकानदारांनी त्यांच्या दुकानावरील पाट्या मराठी भाषेत लावल्या पाहिजेत अशी रोखठोक भूमिका राज ठाकरे यांनी सर्वप्रथम घेतली.
त्यांच्या या भूमिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने मान्यतेची मोहर उमटवली. मराठी(Marathi) भाषेतच पाटी लावली पाहिजे असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबईतील व्यापाऱ्यांना दिले आहेत. पण अद्यापही त्याची शंभर टक्के अंमलबजावणी झालेली नाही. उलट गेल्या काही महिन्यांपासून हिंदी मे बात करो अशी सक्ती अमराठी अर्थात परप्रांतीयांच्याकडून मराठी माणसाला केली जात आहे.
हम मराठी मे बात नही करेंगे अशी मुजोर भूमिका त्यांच्याकडून घेतली जाऊ लागली आहे. परप्रांतीयांची बहुसंख्या असलेल्या निवासी संकुलामध्ये मराठी भाषिक कुटुंबावर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक निवासी संकुलामध्ये मराठी भाषिकांना निवासस्थान विकले जात नाही. गेल्या दोन-तीन महिन्यात घाटकोपर, ठाणे, कल्याण वगैरे परिसरात मराठी भाषिक कुटुंबांना बेदम मारहाण झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

भारतीय पोलीस सेवेतील, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना ते मराठी भाषिक नसतील तर त्यांनी मराठी भाषेतच सर्वसामान्य जनतेशी संवाद साधला पाहिजे असा नियम आहे. मराठी भाषेत बोलण्यासाठी अनेक आयपीएस तसेच आयएएस अधिकाऱ्यांनी मराठी(Marathi) भाषेचे धडे घेतलेले आहेत. विशेष म्हणजे मोडक्या थोडक्या का होईना पण मराठी भाषेतच ही अधिकारी मंडळी सर्वसामान्य जनतेशी संवाद साधत असतात. त्यांच्याकडून मराठी भाषेची प्रतिष्ठा राखली जात असेल तर मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक परप्रांतीय व्यक्तीने मराठी भाषेत संवाद का साधू नये?
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात सुपरीचीत झाली आहे. या मुंबईत कोणीही माणूस उपाशी झोपत नाही अशी ओळख सर्व दूर झाल्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईवर परप्रांतीयांचे लोंढे येतच आहेत. या परप्रांतीयांना मुंबईतील मराठी माणसाने कधीही हटकले नाही. आज मुंबईतील अनेक भाग असे आहेत की तेथे परप्रांतीयांची लोकसंख्या मराठी भाषिकांपेक्षा अधिक आहे. 1971 मध्ये बांगला मुक्ती युद्धानंतर बांगलादेश मधील लक्षावधी लोक आधी पश्चिम बंगाल मध्ये आहे आणि नंतर त्यांनी महाराष्ट्रात, विशेषता मुंबईमध्ये आश्रय घेतला. मानखुर्द, धारावी, मालाड, मुलुंड तसेच पालघर आदि भागामध्ये बांगलादेशी लोक आजही राहतात. विशेष म्हणजे या लोकांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तिथले नागरिकत्व ही मिळवले आहे.
बिहार उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, या राज्यातील लोकांनी रोजगाराच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत धाव घेतली. आणि ते मुंबईतच रमले. पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ ही परप्रांतीय मंडळी मुंबईत राहतात, मात्र त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही हे दुर्दैवी आहे. विशेष म्हणजे हीच मंडळी मराठी माणसाला हिंदी मे बात करो असे म्हणतात तेव्हा मराठी माणसाला राग येणे स्वाभाविक आहे. मराठी माणसाने या परप्रांतीयांना मराठी मे बात करो किंवा मराठीत बोल असे सांगितले की ही मंडळी अंगावर येतात.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ही परप्रांतीय मंडळी नव्हती. बहुतांशी मराठी(Marathi) माणसांनी मुंबई मिळवली आहे. जे हुतात्मे झाले ते बहुतांशी मराठीच आहेत. असे असताना मुंबईत मराठी माणूस उपरा होत असेल तर राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेली कठोर भूमिका योग्य आहे असे म्हणता येईल.
हेही वाचा :
शंका खरी ठरली! ‘ही’ सुंदरी चढली मुंबई इंडियन्सच्या टीम बसमध्ये, हार्दिकला नवीन प्रेम मिळलं?
इंडियन नेव्ही भरती: SSR मेडिकल असिस्टंट पदासाठी करा अर्ज; येथे करा Apply
बॉयफ्रेंडसोबत बोलण्यासाठी मुलीची आयफोनची मागणी, थेट मनगटच कापलं; मग पुढे जे घडलं… Video Viral