सावधान! चहाचा घोट पाडू शकतो आजारी; एका दिवसांत किती कप चहा प्याल? 

भारतातल्या लोकांची सकाळ चहाच्या(tea) घोटानेच सुरू होते. कोट्यावधी लोक मोठ्या प्रमाणात चहा पितात आणि आपल्याकडे चहाला कोणतेही निमित्त चालते. अगदी दोन व्यक्ती भेटल्या तर त्यांच्यात गप्पा होतातच पण चहाचा कप हातात असतोच.. काही जण चहा अति प्रमाणात पितात.

आजची ही बातमी अशा चहाच्या(tea) शौकिनांसाठीच आहे. ठराविक प्रमाणात चहा घेतल्यास त्याचा शरीरावर फारसा परिणाम होत नाही. तसेही चहा पिणे टाळलेच पाहिजे. आपल्याकडील डॉक्टर मंडळी देखील हाच सल्ला देतात. पण चहाची सवय सहजासहजी बंद सुद्धा होत नाही. मग अशा वेळी करायचं तरी काय असा प्रश्न पडला असेल.

यावर साधं उत्तर म्हणजे चहा (tea)कमीत कमी पिणे असू शकते. एक दिवसात किती कप चहा प्यावा म्हणजे शरीराला नुकसान होणार नाही असा प्रश्न उरतोच. थंडीच्या दिवसात पाहिलं तर दिवसातून तीन ते चार कप चहा घेतला जातो. पण उन्हाळ्याच्या दिवसात चहा विचार करूनच घेतला पाहिजे. चहा शरीरात उष्णता निर्माण करतो तसेच डोके शांत ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे प्रत्येक ऋतूत चहा टाळला जात नाही. चला तर मग एक दिवसात किती कप चहा घेतला पाहिजे याचे उत्तर जाणून घेऊ या..

FDA नुसार एका प्रौढ व्यक्तीने एका दिवसात 400mg पेक्षा जास्त कॅफिन इनटेक करणे योग्य नाही. दिवसातून तीन ते चार कप चहा कोणत्याही साइड इफेक्ट विना घेतला जाऊ शकतो. पण व्यक्तिपरत्वे हे प्रमाण बदलू शकते. चहाच्या प्रकारावर सुद्धा हे प्रमाण अवलंबून आहे.

दूध आणि साखरेचा चहा(tea) आरोग्यासाठी जास्त फायदेशीर मानला जात नाही. ग्रीन टी किंवा ब्लॅक टी चे सेवन दुधाच्या चहा पेक्षा जास्त प्रमाणात केले जाऊ शकते. हर्बल टी सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. थंडीच्या दिवसांत आजारांना दूर ठेवण्यासाठी हर्बल टी मदत करतो.

चहामध्ये असलेले कॅफिन, टॅनिन, फ्लोराइड आणि अँटी ऑक्सिडेंट आरोग्याला नुकसानकारक ठरू शकतात. अशा वेळी जेव्हा आवश्यकतेपेक्षा जास्त चहा सेवन केला जातो तेव्हा मांसपेशीमध्ये ओढाताण, हाडांमध्ये वेदना, दातांच्या हिरड्यांमध्ये त्रास सुरू होतो. तसेच उलटीचा त्रास, छातीत जळजळ किंवा ॲसिडिटी, तोंडात चट्टे, अपुरी झोप, महिलांना प्रेग्नंसीत समस्या, वजन वाढणे अशाही व्याधी निर्माण होऊ शकतात. चहात ऑक्सलेट आढळते यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.

हेही वाचा :

पुढील 24 तासांत पाऊस झोडपणार, तुमच्या भागात काय परिस्थिती?

2025मध्ये भारताचा एक नेता बाबा वेंगानंतर नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी ठरणार का खरी

उन्हाळ्यात सतत थकवा येतोय? मग ‘हे’ पेय प्या आणि क्षाराची पातळी वाढवा!