महिलेने दरवाजा उघडताच Delivery बॉयने पँट काढली अन्…; धक्कादायक प्रकार

मुंबईतील गोरेगावमधील व्ही. पी. पोलिसांनी एका 29 वर्षीय फूड डिलेव्हरी बॉयला अटक केली आहे. या व्यक्तीने 28 वर्षीय महिला ग्राहकाचा लैंगिक छळ केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 21 मार्च रोजी हा डिलेव्हरी बॉय पिडितेच्या घरी फूड डिलेव्हर(Delivery Boy) करण्यासाठी आला होता. या तरुणीने मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मागवलेले खाद्यपदार्थ डिलेव्हर करण्यासाठी घरी आलेल्या डिलेव्हरी बॉयने दाराची बेल वाजवली. ही तरुणी दरवाजा उघडण्यासाठी आली असता तिच्या समोर डिलेव्हरी बॉयने अश्लील कृत्य केलं.

पीडित तरुणीने घराचा दरवाजा उघडून खाद्यपदार्थ घेण्यासाठी हात पुढे केले असता डिलेव्हरी बॉयने आपली पॅण्ट काढून तिच्यासमोरच हस्तमैथून केलं. पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. समोरचा प्रकार पाहून धक्का बसलेल्या तरुणीने लगेच घरात असलेल्या तिच्या पतीला आवाज देऊन बोलावलं आणि घडलेला प्रकार सांगितला. तोपर्यंत हा डिलेव्हरी बॉय(Delivery Boy) निघून गेला होता. पती जिन्याने खाली उतरुन गेला आणि त्याने लिफ्टजवळ लॉबीमध्ये या डिलेव्हरी बॉयला पकडलं.

पतीने घडलेल्या घटनेबद्दल जाब विचारला असता दोघांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचं रुपांतर धक्काबुक्कीत झालं आणि संधीचा फायदा घेत डिलेव्हरी बॉय इमारतीच्या आवारातून पळून गेला. यानंतर या जोडप्याने फूड डिलेव्हर अॅप्लिकेशनवरुन कस्टमर केअरची संपर्क साधला आणि डिलेव्हरी बॉयने केलेला घृणास्पद प्रकार सांगितला. कंपनीकडून फूड डिलेव्हरी बॉयवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं.

मात्र अनेक दिवस पुढे काहीच घडलं नाही. नियमित फॉलोअप घेतल्यानंतरही कोणतीच कारवाई होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर या जोडप्याने व्ही. पी. रोड पोलिसांकडे तक्रार दाखल केली. अधिकृतपणे एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरु केला.

पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी हा गावदेवी परिसरात असल्याचं निश्चित केलं. “4 एप्रिल रोजी आरोपीला गावदेवी परिसरातील कँण्डी ब्रिजजवळ अटक करण्यात आली. आरोपीचं नाव शाहरुख शेख मोहम्मद शेख असं असून तो 29 वर्षांचा आहे. तो चेंबूरचा रहिवाशी आहे,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी ‘मिड-डे’ला दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम 75 अंतर्गत शेख विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या कलमाअंतर्गत लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांची नोंद केली जाते. अशाप्रकारे आरोपीने यापूर्वीही काही महिला ग्राहकांना त्रास दिला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

उन्हाळ्यात सतत एसीमध्ये बसल्यामुळे वाढतो मायग्रेनचा धोका

“लिप-टू-लिप किसिंग सीननंतर पूर्ण रात्र मी…”, नीना गुप्तांनी केला ‘तो’ खुलासा!

अक्षय तृतीयेला खुशखबर मिळणार,लाडक्या बहि‍णींच्या खात्यात खटाखट ₹१५०० जमा होणार?