देशभरात सगळीकडे कडक उन्हाळा वाढला (country)आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वाढलेली उष्णता शरीरासाठी अतिशय घातक आहे. शरीरात उष्णता वाढल्यानंतर डिहायड्रेशन किंवा अपचनाची समस्या उद्भवू लागते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वच घरांमध्ये पंखा, एसी, कुलर इत्यादी गोष्टी वापरल्या जातात. यामुळे उष्णता कमी होऊन थंड वारे लागतात.घरोघरी आणि ऑफिसमध्ये एसी दिवसभर सुरू असलेले आपण पाहतो. उन्हाच्या तीव्र झळाळीपासून आराम मिळण्यासाठी एसीची थंडगार हवा उपयुक्त ठरते. पण, मायग्रेन असणाऱ्या व्यक्तीने एसीची हवा घेऊ नये, असे सांगितले जाते. यामागचे नेमके कारण काय? हेच कित्येक जणांना ठाऊक नसते.

वाढत्या उष्णतेमुळे तळपायांची आग होते? ‘या’ पद्धतीने करा कापूरचा तेलाचा वापर, त्वचा राहील कायम थंड
खरंतर, मायग्रेनचा त्रास हल्ली तरुणांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांनाच आहे. मायग्रेन ही एक प्रकारची तीव्र डोकेदुखी आहे, जी लवकर थांबत नाही. आवाज, भूक, स्ट्रेस, झोपेचा अभाव हवामानात अचालक बदल यामुळे मायग्रेनचा त्रास सुरू होतो. त्यामुळे मायग्रेनचा त्रास असणारी व्यक्ती जेव्हा एसीच्या संपर्कात येते तेव्हा हा त्रास आणखी वाढू शकतो. त्यामुळे मायग्रेनचा त्रास असल्यास एसीमध्ये बसणे टाळावे. एसीच्या थंड हवेमुळे डोकेदुखी वाढण्याची शक्यता असते. एसीची थंड हवा थेट डोक्यावर पडल्यास किंवा चेहऱ्यावर आल्यास (country)नसा आकुंचन पावतात आणि वेदना आणखी तीव्र होण्यास सुरूवात होते. एसीमध्ये जास्त वेळ राहिल्याने डिहाड्रेशनचा त्रास होऊ शकतो, ज्यामुळे डोकेदुखी वाढू शकते.
एसीमुळे हवेतील आर्द्रता कमी होते, ज्यामुळे डोकेदुखी वाढते. एसीमुळे डोळे कोरडे होतात, ज्यामुळे डोळ्यांवरील ताण वाढतो, जो मायग्रेनला ट्रिगर करू शकतो. एसीचे तापमान जास्त थंड ठेवू नये. एसीची नियमितपणे साफ करणे. डोकेदुखी सुरू झाल्यावर भरपूर विश्रांती घ्यावी. पौष्टिक आणि संतुलित आहार घ्यावा. एसीमुळे हवामान जास्त कोरडे असल्यास ह्युमिडिफायरचा वापर करावा. एसीच्या हवेमुळे डोळे कोरडे होतात, तज्ञांच्या सल्ल्याने डोळ्यांमध्ये ओलावा कसा टिकून राहील यावर उपाय जाणून घ्यावेत. स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा, ध्यान, मेडिटेशनसारख्या सवयी अवलंबवा. तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर अधूनमधून बाहेर जाऊन सूर्यप्रकाश घ्यावा.

वयाच्या तिशीमध्ये हाडांमधून कटकट आवाज येतो? वाढत्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित ‘या’ पद्धतीने चालावे मायग्रेनमुळे डोकेदुखीची समस्या तीव्र झाल्यानंतर अनेक लॉक्ड डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेतात. मात्र वारंवार गोळ्या खाणे आरोग्यासाठी घातक ठरते.(country) मायग्रेनची समस्या उद्भवू लागल्यानंतर घरगुती उपाय करू सुद्धा आराम मिळवता. आल्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे तीव्र डोके दुखीपासून आराम मिळतो. याशिवाय आहारात मसाल्यांच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे तात्काळ आराम मिळेल.
हेही वाचा :
‘माझ्या मुलाने माझ्या वडिलांना खाल्ले…’ चिमुकल्या बाळाने गिळल्या आजोबांच्या अस्ती Video Viral
आज अनेक शुभ योग; ‘या’ 5 राशी मालामाल होणार? मनातील इच्छा होतील पूर्ण..
महाराष्ट्र होरपळणार! ‘या’ भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा