भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू(cricketer) आणि मराठमोळा खेळाडू केदार जाधव याने आज (8 एप्रिल) अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्याने भाजपाच्या सद्स्यत्वाची शपथ घेतली. केदार जाधवच्या या राजकीय इनिंगला भाजपकडून जोरदार स्वागत मिळाले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी हा प्रवेश पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांनी आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपात आज अनेक नेते, पदाधिकारी दाखल झाले. मात्र सर्वात जास्त चर्चेत राहिला तो म्हणजे केदार जाधवचा प्रवेश. क्रिकेटच्या(cricketer) मैदानावर आपल्या अष्टपैलू खेळाने लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या केदारने आता राजकारणाच्या मैदानातही पाऊल टाकले आहे.
39 वर्षीय केदार जाधवने 2023 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्समधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2020 मध्ये न्यूझिलंडविरुद्ध खेळला होता. आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत त्याने 73 सामने खेळत 1389 धावा, दोन शतकं, सहा अर्धशतकं आणि 27 विकेट्स घेतल्या होत्या. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये मात्र त्याचे योगदान मर्यादित राहिले.
राजकारणात प्रवेश केल्यानंतर केदार जाधवला कोणती भूमिका मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याचे पक्षात स्वागत करत त्याच्या अनुभवाचा पक्षाच्या विस्तारासाठी उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. क्रिकेटमधील अनुभव, लोकांशी असलेले नाते आणि प्रसिद्धीचा फायदा भाजपला आगामी निवडणुकांमध्ये मिळू शकतो.
हेही वाचा :
फडणवीसांचा मार्ग इतर मंत्र्यांना नकोसा?, महायुतीच्या मंत्र्यांमध्ये वादाची ठिणगी?
आंघोळीनंतर ही चूक करू नका, अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम!
अभिनेत्री अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात करिकर गेलं तुरुंगात जाव लागलं आयुष्य उद्धवस्त झालं