इचलकरंजी– इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या सुळकुड पाणी योजनेच्या(scheme) अंमलबजावणीसाठी ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी करत इचलकरंजी नागरिक मंच तर्फे आयुक्त पल्लवी पाटील यांना आज निवेदन देण्यात आले. या निवेदनात योजनेबाबत झालेल्या संपुर्ण घडामोडींचा आढावा घेत सुळकुड हीच योजना योग्य असल्याचे ठासून सांगण्यात आले.तांत्रिक समितीच्या बैठकीत आपण सुळकुड योजनेच्या अंमलबजावणीसाठी आग्रही रहावे व तसेच म्हणणे ठामपणे मांडावे असे निवेदनाद्वारे सुचवण्यात आले.

सदर योजना(scheme) २०२० मध्ये मंजूर झाली नोव्हेंबर २०२२ मध्ये अमृत २ मध्ये समावेश होऊन,त्यासाठी १६० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र नदीकाठच्या काही गावांच्या विरोधामुळे व स्वार्थी राजकारणामुळे योजनेला अडथळा निर्माण झाला. २१ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शासनस्तरावर तक्रारींचा सविस्तर अहवाल पाठवण्यात आला असून, त्यामध्ये सर्व गैरसमज व राजकीय विरोधाचे मुद्दे खोडून काढले आहेत.
निवेदनात, काळम्मावाडी धरणातील गळती सुधारण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे, आणि त्यानंतर पाणीसाठ्यात होणाऱ्या वाढीचा उल्लेख करून, सुळकुड योजना हीच उपयुक्त आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला. तसेच, इतर पर्यायांमुळे भविष्यात अधिक अडथळे निर्माण होऊ शकतात, यावरही नागरिक मंचाने बोट ठेवले.

आमदार राहुल आवाडे आणि खासदार धैर्यशील माने यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत, दोघांनीही सुळकुड योजनेसाठी ठोस भूमिका घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली. बैठकीत उपस्थित सदस्यांनी, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ही योजना तातडीने राबवण्याची मागणी केली.

साठवण क्षमतेसाठी मार्ग निघू शकतो, २ वेळेला पूर्वव्यव्हारता अहवाल देणारे आता नवनवीन मुद्दे का उपस्थित करत आहेत हा ही मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला.
आयुक्त पल्लवी पाटील यांनी देखील सुळकुड योजनेबाबत आग्रही भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.
सुरवातीला आयुक्त पल्लवी पाटील यांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी अमित बियाणी, राम आडकी, महेंद्र जाधव, जतीन पोतदार, सुषमा साळुंखे,राजेश बांगड,दीपक पंडित,रामचंद्र निमणकर,अभिजित पटवा आदि सदस्य उपस्थित होते.
आयुक्त पल्लवी पाटील यांचे स्वागत करताना सुषमा साळुंखे, अभिजित पटवा,अमित बियाणी व इतर
आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदन देताना अभिजित पटवा, राम आडकी,महेंद्र जाधव, राम आडकी
हेही वाचा :
तरुणी एकटी राहायची, एकेदिवशी Instagram वर मेसेज आला, आणि जीव जडला, पण नंतर जे घडलं त्याने…
क्रिकेटच्या मैदानातून थेट राजकारणात! स्टार क्रिकेटरचा भाजपात प्रवेश
‘Excuse me’ बोलण्याचा संताप, मराठी बोला सांगत तरुणीला बेदम मारहाण; VIDEO व्हायरल