MPSC मुख्य परीक्षा पुढे ढकलणार? उमेदवारांनी केली मोठी मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा (postponed)मुख्य परीक्षेवर आता आरक्षणाच्या गोंधळामुळे प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. उमेदवारांनी स्पष्ट मागणी केली आहे की, ‘ईडब्ल्यूएस’ आणि ‘एसईबीसी’ प्रवर्गात सुरू असलेला तांत्रिक गोंधळ मिटेपर्यंत परीक्षा किमान 15 दिवस पुढे ढकलावी. राज्यसेवा मुख्य परीक्षा 26, 27 आणि 28 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. मात्र, अद्याप केवळ 2 हजार अर्ज झाले असून उर्वरित 5 हजारांहून अधिक पात्र उमेदवार प्रवर्गातील तांत्रिक त्रुटींमुळे अर्ज करू शकलेले नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

ऑनलाईन प्रणालीमध्ये प्रवर्ग बदलाची सुविधा नाही :
‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातून ‘एसईबीसी’ किंवा ‘एसईबीसी’मधून ‘ओबीसी’मध्ये जाण्याची आवश्यकता असलेल्या उमेदवारांसाठी MPSCच्या ऑनलाइन (postponed)अर्ज प्रणालीमध्ये कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांना अंतिम अर्ज करण्यापासून थांबावं लागत आहे.राज्यसेवा मुख्य परीक्षा ही MPSCच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाची शेवटची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अतिरिक्त तणाव आहे. त्यामुळे अधिक संवेदनशीलतेने निर्णय घेण्याची गरज आहे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली आहे.

MPSC l सुधारित निकालानंतरही गोंधळ कायम :
12 मार्च 2025 रोजी जाहीर झालेल्या पूर्व परीक्षेच्या निकालात प्रवर्ग त्रुटी असल्यामुळे तो रद्द करून 29 मार्चला सुधारित निकाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे(postponed)अतिरिक्त 318 उमेदवारांना पात्रता मिळाली. पण आता त्यांनाही अर्ज करण्यासाठी वेळ मिळत नाहीये, हे गंभीर प्रश्न उपस्थित करतं.दरम्यान, अनेक लोकप्रतिनिधींनी सुद्धा ही मागणी आयोगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण अजूनही ‘ईडब्ल्यूएस ते एसईबीसी’ लिंक सुरु झाली नाही, आणि त्यामुळे उमेदवार संभ्रमात आहेत. परीक्षेची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतशी ही मागणी अधिक तीव्र होत आहे.

हेही वाचा :

सुळकुड योजनेच्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजी नागरिक मंच आक्रमक,आयुक्तांना आग्रही राहण्याचे निवेदन.

आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, उत्पन्नाचे मार्ग मोकळे होणार

झापुक झुपूक सुरज आणि किंग कोहली आले समोरासमोर, Video Viral