गगरमागरम मोमोज… आणि त्यासोबत मिळणारी(ingredients) ती झणझणीत लाल रंगाची चटणी! तोंडाला पाणी आलं ना? हे कॉम्बिनेशन म्हणजे फूड लव्हर्ससाठी एकदम स्वर्गसुख. मोमोज कितीही चविष्ट असले तरी त्या चटणीशिवाय ते अपूर्णच वाटतात, हो की नाही?लॉकडाऊनच्या काळात मोमोज सहज मिळणं शक्य नव्हतं. म्हणूनच अनेकांनी घरच्या घरी मोमोज आणि डम्पलिंगसारखा हा स्नॅक स्वतः बनवण्याचा प्रयत्न केला – आणि तो मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरला. यातूनच सिद्ध झालं की आपण मोमोजवर किती प्रेम करतो!

हे लाडके मोमोज नेमके कुठून आले यावर एक नजर टाकूया. काहींचं म्हणणं आहे की मोमोज तिबेटमधून आले, तर काहींच्या मते नेपाळी स्वयंपाक्यांनी त्याला लोकप्रिय केलं. पण मोमोज कुठून आले यापेक्षा, आज ते भारतात किती लोकप्रिय झाले आहेत हे अधिक महत्त्वाचं! तंदूरी मोमोज, (ingredients)फ्रायड मोमोज, अगदी चॉकलेट मोमोजसुद्धा आज खवय्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही डिश सगळ्यांची फेवरिट ठरली आहे.आता बोलूया या मोमोजसोबत मिळणाऱ्या खास लाल चटणीबद्दल जी मोमोजइतकीच सगळ्यांची फेवरिट आहे. ही चवदार, झणझणीत आणि थोडीशी आंबटसर अशी चव देणारी लाल चटणी बनवणं खूपच सोपं आहे.
झणझणीत मोमोज चटणी रेसिपी
लागणारे साहित्य:
- सुक्या लाल मिरच्या – १० ते १२
- लसूण पाकळ्या – ८ ते १०
- मीठ – चवीनुसार
- तेल – २ ते ३ टेबलस्पून
ऐच्छिक – १ टेबलस्पून सिरका / लिंबाचा रस – अधिक झणझणीत व चवदारपणासाठी
कृती:
सुक्या लाल मिरच्यांना कोमट पाण्यात (ingredients)किमान ३० मिनिटे भिजवा.
आता मिरच्या,सालीसकट लसूण, मीठ आणि तेल मिक्सरमध्ये घालून बारीक वाटा.
पाणी न घालता वाटल्यास चटणी अधिक घट्ट होते. हवे असल्यास थोडं पाणी वापरू शकता.आणि अशी झाली तुमची झणझणीत चवदार चटणी तयार! ही चटणी गरमागरम मोमोजसोबत सर्व्ह करा.
हेही वाचा :
सुळकुड योजनेच्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजी नागरिक मंच आक्रमक,आयुक्तांना आग्रही राहण्याचे निवेदन.
आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, उत्पन्नाचे मार्ग मोकळे होणार
झापुक झुपूक सुरज आणि किंग कोहली आले समोरासमोर, Video Viral
ही तर हद्दच! Uber कॅबमध्ये प्रवासी काय-काय विसरून जातात
उन्हाळ्यात स्नायूंमध्ये पेटके येतात? त्यावर कसे नियंत्रित ठेवावे,
उन्हाळ्यात फोन चार्जिंगला लावल्यास ओव्हरहीट होतो? मग ‘हे’ 5 हॅक्स