मंगेशकर कुटुंबियांचा “कंठ” दाटून का आला नाही……?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबियांच्यावर(family) टीका करताना जे शब्द वापरले आहेत, त्याचे समर्थन करता येणार नाही, पण त्यांच्याकडून करण्यात आलेली जहाल टीका ही एका सात्विक संतापाची परिणती आहे असे म्हणता येईल. तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूचे प्रकरण राज्यभर गाजत असताना मंगेशकर कुटुंबीयांपैकी कोणीही त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. रुग्णालयाचे विश्वस्त म्हणून या विषयावर साधे दुःख व्यक्त करण्याची संवेदनशीलता त्यांच्याकडून दाखवली गेलेली नाही. याबद्दलची आता राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.

तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी भारतीय जनता पक्षासह सर्वच राजकीय पक्षांनी, सर्वच संघटनांनी तसेच सामान्य जनतेने दिनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून या रुग्णालयाचा कारभार हा सर्व नियम धाब्यावर बसवून कसा चालू आहे याची माहिती समोर येऊ लागली आहे. काही असंवेदनशील प्रकरणेही पुढे आल्यानंतर या रुग्णालयाबद्दल लोकांचा राग वाढू लागला आहे. त्याचीच प्रातिनिधीक पण जहाल प्रतिक्रिया म्हणून विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याकडे पाहावे लागेल.

मंगेशकर कुटुंबीयांचे(family) सांगितिक क्षेत्रात मोठे योगदान आहे, ते कोणीही नाकारणार नाही. देशात आणि महाराष्ट्रात तशी आणखी काही मंडळी सांगीतिक क्षेत्रात होती आणि आहेत. संगीतकार खय्याम हे त्यापैकीच एक होत. त्यांनी त्यांची सर्व संपत्ती एका सेवाभावी संस्थेला दान देऊन टाकली आहे. जनतेकडून मिळालेली संपत्ती जनतेकडेच देत आहे असे उदात्त विचार त्यांनी तेव्हा व्यक्त केले होते.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, अक्षय कुमार यांच्यासारखे कलाकार सामाजिक संस्थांना, व्यक्तींना, खेळाडूंना अशाच प्रकारची आर्थिक मदत देत असतात. डॉक्टर श्रीराम लागू यांनीही सामाजिक कार्यकर्त्यांना कृतज्ञता निधी द्यायला सुरुवात केली होती. भरलेली ओंजळ समाजासाठी, गरजूंसाठी रिकामी करा, ओंजळीची मूठ बनवाल तर ही मूठ रीती होत जाणार आहे.

(जशी मुठीत वाळू राहत नाही) असं तत्व या मंडळींचं होतं आणि आहे. या तत्त्वात मंगेशकर कुटुंब(family) बस्त का या चर्चेला विजय वडेट्टीवार यांनी तोंड फोडला आहे. पण त्यासाठी वापरलेली भाषा समर्थनीय नाही. संयुक्त भाषेत त्यांना या कुटुंबावर टीका करता आली असती. पण आपल्या वक्तव्यावर, भाषेवर ते अद्यापही ठाम आहेत.

मंगेशकर कुटुंबाबद्दल विशेषता लता मंगेशकर यांच्या बद्दल कोल्हापुरात फारसं चांगलं बोललं जात नाही हे वास्तव आहे पण ते जाहीरपणे बोलले जात नाही इतकच. जयप्रभा स्टुडिओ विक्री प्रकरण हे त्यामागचं मुख्य कारण आहे. मराठी चित्रपट सुट्टीचा मानबिंदू म्हणून चित्र तपस्वी भालजी पेंढारकर यांच्या मालकीच्या जयप्रभा स्टुडिओ कडे पाहिले जाते. हा स्टुडिओ लता मंगेशकर यांच्याकडे गहाण होता. भालजींचे एक शिष्य दादा कोंडके यांनी लता मंगेशकर यांना एक कोरा धनादेश सही करून पाठवला आणि तुम्ही म्हणाल तो आकडा लिहून हा धनादेश वटवावा आणि स्टुडिओ कर्जमुक्त करून तो भालजींना द्यावा असे आवाहन केले होते. पण लता मंगेशकर यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. या स्टुडिओचे पुढे काय झाले हे सर्वश्रुत आहे. त्यांच्या मनात आले असते तर हा स्टुडिओ आज वाचला असता.

दीनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णालयाची काळी बाजू गेल्या आठ दिवसात समोर आल्यानंतर, मंगेशकर कुटुंबाकडे समर्पणाची भावना नसल्याचे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले आणि मग जयप्रभा स्टुडिओ बद्दल चर्चा सुरू झाली. तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी मंगेशकर कुटुंबीयांच्या कडून कोणतीही प्रतिक्रिया पुढे आलेली नाही. तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे हा विषय थोडासा बाजूला ठेवून मंगेशकर कुटुंबीयांपैकी कोणीतरी दुःख व्यक्त केले पाहिजे होते. तशी संवेदनशीलता त्यांनी दाखवायला हवी होती. या रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळात मंगेशकर कुटुंबातील(family) चार सदस्य आहेत आणि त्यापैकी कोणीही बोलायला पुढे येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच या कुटुंबाबद्दल आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. आणि त्याला विजय वडेट्टीवार यांनी तोंड फोडले आहे.

जवळपास एक हजार बेडचं पुण्यातील सर्वात मोठं हे रुग्णालय आहे. दरवर्षी जवळपास 70 हजार रुग्ण या रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत असतात तर रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दरवर्षी अडीच लाख रुग्ण येत असतात. अगदी सुरुवातीला सेवाभावी वृत्तीने हे रुग्णालय चालवले जात होते पण नंतर मात्र या रुग्णालयाचा दुकानदारी सुरू झाली. एकूण नफ्यापैकी दोन टक्के रक्कम आरक्षित ठेवायची असते. अशी सुमारे 35 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक असताना, ती गरीब रुग्णांच्या उपचारासाठी वापरली गेली नाही हे वास्तव समोर आले आहे. याच रकमेतून तनिषा भिसे यांच्यावर तातडीने उपचार करता आले असते. तथापि दुर्दैवाने तसे घडलेले दिसत नाही.

हेही वाचा :

चोर म्हटल्याच्या कारणावरून पाच वर्षांच्या चिमुकलीचा ओढणीने गळा आवळून खून

मेट्रो स्टेशनवर अश्लील चाळे! त्याने गर्लफ्रेंडच्या टी-शर्टमध्ये हात घातला अन्..

राज्यात पुढील चार दिवस अवकाळीचे, ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट