कानपूर : नवऱ्याने बायकोला(wife) शेजाऱ्यासोबत बेडवर नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले. त्यानंतर रागाच्या भरात नवऱ्याने शेजाऱ्याचे गुप्तांग चावण्याचा प्रयत्न केला. या घटनेत शेजारी गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुरुवारी रात्री ही विचित्र घटना घडली.

आरोपी नवऱ्याने बायकोला शेजारीच राहत असलेल्या तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. हे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. रागाच्या भरात त्याने शेजाऱ्याचे गुप्तांग चावून त्याला जखमी करण्याचा प्रयत्न केला. तरुणही अत्यंत रक्तबंबाळ झाला. घटनेनंतर जखमी अवस्थेतच तो मदतीसाठी पोलीस स्टेशनमध्ये गेला. पोलिसांनी त्याला लगेच लाला लजपत राय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी सांगितले की, रविवारपर्यंत या प्रकरणी कोणाकडूनही अद्याप तक्रार आलेली नाही. तक्रार दाखल झाल्यानंतरच ते या प्रकरणी कारवाई करतील.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जोडपे काही वर्षांपूर्वीच विवाहबंधनात अडकले होते. ते कानपूरच्या बाबूपुरवा भागात भाड्याच्या घरात राहतात. गुरुवारी संध्याकाळी नवऱ्याने बायकोला(wife) सांगितले, की तो शुक्रवारी काही कामानिमित्त बाहेरगावी जाणार आहे. पण तो अचानक गुरुवारी रात्री घरी परतला. घरी आल्यावर त्याला त्याचा शेजारी त्याच्या बायकोसोबत बेडवर आक्षेपार्ह स्थितीत दिसला. हे पाहून त्याला खूप राग आला. त्याने त्या तरुणाला पकडले आणि झटापटीत त्याच्या गुप्तांगाचा चावा घेतला. यामुळे तो गंभीर जखमी झाला.

बाबूपुरवाचे इन्स्पेक्टर अरुण द्विवेदी यांनी सांगितले की, जखमी व्यक्तीवर लाला लजपत राय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ते म्हणाले, “आतापर्यंत कोणाही तक्रार दाखल केलेली नाही. तक्रार दाखल झाल्यावर FIR नोंदवून पुढील कारवाई केली जाईल.” या घटनेमुळे परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे. गोंधळ ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले होते. पण पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर ते तिथून निघून गेले.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोक या घटनेबद्दल वेगवेगळ्या चर्चा करत आहेत. काहींना हे धक्कादायक वाटत आहे, तर काहीजण यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत. अखेरीस, हे प्रकरण काय वळण घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास कसा करतात आणि दोषींना काय शिक्षा देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि लवकरच सत्य समोर आणतील.
हेही वाचा :
गुजरातच्या धर्तीवर, आता कोल्हापुरातही चिंतन व्हावे!
वैरीण आईने लेकीचेच नको ते व्हिडिओ काढून स्वतःच्या बॉयफ्रेंडला पाठवले आणि….
सांगलीत लग्नाच्या आमिषाने दिव्यांग तरुणीवर अत्याचार