भांडण करणं पतीला पडलं महागात, पत्नीने थेट छतावरूनच खाली फेकलं… Video Viral

पती-पत्नीचं(wife) नातं हे फार अनोखं असत, यात प्रेम, वाद, काळजी अशा सर्वच गोष्टींचे संमिश्र असते. अस म्हणतात की, कोणतंही नातं टिकवण्यासाठी एकाने तरी माघार घेणे किंवा समजून घेणे गरजेचे असते नाहीतर वाद आणखीन वाढू शकतो.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पती-पत्नीमधील भांडण दिसून आले. हे भांडण पुढे इतके टोकाला जाते की पत्नी(wife) थेट आपल्या पतीला छतावरूनच खाली फेकते. हे सर्वच फार धक्कादायक असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.

व्हिडिओमध्ये पती पत्नी दोघेही मातीच्या घराच्या छतावर उभे राहून एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. नवरा रागात काहीतरी बोलत आहे, तर बायकोही उलट उत्तर देत आहे. काही क्षणातच वातावरण इतके तापते की पत्नी अचानक पतीला जोरात धक्का देते. ज्यानंतर नवरा सरळ खाली पडतो आणि हे दृश्य पाहून लोक थक्क होतात.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पती छतावरून खाली पडला आहे, परंतु तो किती गंभीर जखमी झाला हे स्पष्ट झालेले नाही. कोणीतरी ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली आणि आता हा व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला आहे. काही लोक याला खरी घटना मानत आहेत तर काही जण तिला खोटं किंवा नाट्यमय म्हणत आहेत. दरम्यान नातेसंबंधातील राग कोणत्या ठरला जाऊ शकतो याचे उदाहरण या व्हिडिओतून पाहायला मिळते.

ही घटना @rareindianclips नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त आहे. एका युजरने लिहिले आहे, “आजकालच्या पत्नींशी पंगा घेऊ नये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्हिडिओ मेकरची सावली स्पष्टपणे दिसत आहे, हे फेक आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “म्हणून छतावर जाऊन कधी भांडू नये”.

हेही वाचा :

एसटी बसने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी…

६० वर्षीय आमिर खानने धरला नव्या प्रियेसीचा हात; कोण आहे गौरी स्प्रेट? Video Viral

चेंडू समोर असूनही कितीतरी वेळ रापत राहिला ईशान किशन… सर्वत्र हास्याचा कल्लोळ; Video Viral

सांगलीमध्ये काँग्रेसला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांनी सोडली साथ